घररायगडमाणगावच्या कचेरी मार्गावर अतिक्रमण

माणगावच्या कचेरी मार्गावर अतिक्रमण

Subscribe

शहराच्या मुख्य रस्त्यालगत असणार्‍या कचेरी मार्गाला सध्या फळ, भाजी, तसेच मच्छी विक्रेत्यांनी घेरले असून, याचा परिणाम वाहतुकीच्या अडथळ्यात होत आहे. हा मार्ग रहदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.

शहराच्या मुख्य रस्त्यालगत असणार्‍या कचेरी मार्गाला सध्या फळ, भाजी, तसेच मच्छी विक्रेत्यांनी घेरले असून, याचा परिणाम वाहतुकीच्या अडथळ्यात होत आहे. हा मार्ग रहदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. पोलीस ठाणे, शाळा, महाविद्यालय, मध्यवर्ती प्रशाकीय भवन, पंचायत समिती, लघु पााटबंधारे कार्यालय, महावितरण कार्यालय, काही रुग्णालये, प्रांत कार्यालय, जीवन प्राधिकरण, जलशुद्धीकरण केंद्र, ग्रामदैवत श्री वाकडाई देवी मंदिर यासह अनेक अन्य कार्यालये मार्गावर आहे. विक्रेत्यांनी या ठिकाणी बस्तान बसविण्यास सुरुवात केल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून जात असून, विद्यार्थ्यांसह नोकरदार, व्यावसायिक यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच महामार्ग आणि बाजारपेठेत अवैध पार्किंग करणार्‍या वाहन चालकांवर कारवाई होत असल्यामुळे ते आपली वाहने कचेरी मार्गावर मनमानपणे लावून निर्धास्त रहातात. त्यामुळे बससारखे मोठे वाहन आले तर काही वेळ दुतर्फा वाहतूक ठप्प होते.

माणगाव शहरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. कचेरी मार्गासह निजामपूर मार्गावर देखील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
-योगेश सुळे, सरचिटणिस, माणगाव तालुका भाजप

- Advertisement -

वाढत्या अतिक्रमणाकडे नगर पंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे स्थानिकांप्रमाणे कामासाठी दूरदूरहून येणारे याबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. दळणवळणाच्या सुविधा, जागांचे वाढलेले भाव यामुळे शहराला गेल्या काही वर्षांंत महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र मूलभूत सुविधांकडे लक्ष दिले जात नसून याबाबत संबंधित अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी काहीही बोलण्यास तयार नाहीत.

माणगाव शहरातील कचेरी मार्ग परिसरात महत्त्वाची कार्यालये आणि शाळा, महाविद्यालय असल्याने रस्ता नेहमी गजबजलेला असतो. याकरिता अतिक्रमणे हटवून हा एक दिशा मार्ग करावा आणि दुसर्‍या बाजूकडील वाहनांना कालवा, साईनगर मार्गे वळविण्यात यावे.
-कुंडलिक थोरे, बहुजन समाज पार्टी नेते, माणगाव

- Advertisement -

हेही वाचा –

विरोधी पक्षनेतेपदाचा अगला स्टेशन मुंब्रा…!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -