घरक्रीडाAustralian Open : जोकोविच 'पुन्हा' अजिंक्य; तब्बल नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद

Australian Open : जोकोविच ‘पुन्हा’ अजिंक्य; तब्बल नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद

Subscribe

मागील वर्षीच्या अंतिम सामन्यात डॉमिनिक थीमने जोकोविचला चांगली झुंज दिली होती. यंदा मात्र मेदवेदेव्हला त्याने सहजपणे पराभूत केले.

सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने तब्बल नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्याने रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्हचा ७-५, ६-२, ६-२ असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवला. या विजयामुळे जोकोविचचे सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली. जोकोविचचे हे एकूण १८ वे ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले. त्यामुळे तो रॉजर फेडरर आणि राफेल नदालच्या २० ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या अधिक जवळ पोहोचला आहे.

मागील वर्षीच्या अंतिम सामन्यात डॉमिनिक थीमने जोकोविचला चांगली झुंज दिली होती. यंदा मात्र मेदवेदेव्हला त्याने सहजपणे पराभूत केले. मेदवेदेव्ह अंतिम सामन्यापूर्वी २० सामने अपराजित होता. अंतिम सामन्यातील पहिल्या सेटमध्ये त्याने चांगला खेळ केला. मात्र, जोकोविचने मोक्याच्या क्षणी त्याचा खेळ उंचावत हा सेट ७-५ असा जिंकला. दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचने अधिकच आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मेदवेदेव्हने काही चुका केल्या. याचा फायदा घेत जोकोविचने हे दोन्ही सेट ६-२ आणि ६-२ असे जिंकत तब्बल नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -