घरताज्या घडामोडीपुद्देचरीमध्ये कांग्रेसचे सरकार गडगडले, मुख्यमंत्री नारायणसामी यांचा राजीनामा

पुद्देचरीमध्ये कांग्रेसचे सरकार गडगडले, मुख्यमंत्री नारायणसामी यांचा राजीनामा

Subscribe

पुद्दुचेरीत विधानसभेत सोमवारी मुख्यमंत्री व्ही नारायणसामी हे बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. यामुळे पुद्दुचेरीत काँग्रेसचे सरकार गडगडले आहे.

पुद्दुचेरीत विधानसभेत सोमवारी मुख्यमंत्री व्ही नारायणसामी हे बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. यामुळे पुद्दुचेरीत काँग्रेसचे सरकार गडगडले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी विधानसभा स्थगित केली. विधानसभेत बहुमत सिद्द न झाल्याने काँग्रेसचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनी आपला राजीनामा नायब राज्यपालांकडे पाठवला आणि आता ते पायउतार झाले आहेत.

रविवारी काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा दिल्याने ३३ सदस्य संख्या असलेल्या पुदद्चेरी विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ ११ झाले. विश्वासदर्शक ठरावावेळी आवश्यक असलेले संख्याबळ गाठू न शकल्याने नारायणसामी यांचा विश्वासदर्शक ठरावात पराभव झाला. ३३ सदस्य विधानसभेत नारायणसामींच्या बाजूने ११ मते तर विरोधात १४ मते पडल्याने व्ही नारायणसामींनी पदाचा राजीनामा दिला आहे.

- Advertisement -

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -