घरमनोरंजनअजून एक अभिनेता झाला बाबा ,पार पडला आगळावेगळा नामकरण सोहळा

अजून एक अभिनेता झाला बाबा ,पार पडला आगळावेगळा नामकरण सोहळा

Subscribe

अभिनेता सचिन देशपांडे याला गोंडस मुलगी झाली आहे.

प्रसिद्ध मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मध्ये श्रेयसची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराच्या घरी तिसऱ्या पाहुण्याचे आगमन झाले. श्रेयस म्हणजेच अभिनेता सचिन देशपांडे याच्या घरी पाळणा हलला आहे. त्याला गोंडस मुलगी झाली आहे. श्रेयस २४ डिसेंबर २०२० रोजी बाबा झाला आणि २५ फेब्रुवारी २०२१ रोजी सचिनने त्याच्या मुलीचे बारसे केले. परंतु, हे बारसे त्याने अनोख्या पद्धतीने साजरे केले आहे. हा आगळावेगळा नामकरण सोहळा सोशलमिडियावर लक्षवेधक ठरला आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे अनेक सण-समारंभ साजरे करता येत नाही, कारण सण-समारंभ म्हटलं की, नातेवाईक आणि अनेक लोक ही येतच असतात. जमावबंदी असल्याकारणाने अभिनेता सचिन देशपांडेने युक्ती लढवली आहे. त्याने त्यासंदर्भात त्याच्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओ अनेकांची पसंती मिळाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Deshpande (@sachin_deshpande)

- Advertisement -

या व्हिडिओत लहान मुलीच्या बोबडेबोल वापरुन नावदेखील सांगण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये लहान मुलगी सांगत आहे की, अनेकांना तिच्या बारशाला येण्याची इच्छा होती. परंतु, सगळ्यांना येणे शक्य झाले नाही. ती कुणावरही रागावलेली नाही आणि तिचे नाव मीरा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. प्रेक्षकांना सचिनची ही भन्नाट कल्पना प्रचंड आवडली आहे.

सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे, कुठलाही समारंभ करण्यावर अनेक बंधनं आली आहेत, पण त्याच बरोबर सोहळे, समारंभ साजरा करण्याच्या नवनवीन कल्पना ही येऊ लागल्या आहेत, म्हणूनच आमच्या परीचा आभासी नामकरण सोहळा करण्याचा एक वेगळा प्रयत्न आम्ही करत आहोत. तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आणि आमच्या लेकी ला आशीर्वाद ही नक्की द्या. – असं आमंत्रण करत, अशा आशयाचे कॅप्शन अभिनेता सचिन देशपांडे याने नामकरणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – केरळ प्रवासी ट्रेनमधून स्फोटकांचा साठा जप्त, १०० जिलेटीन कांड्या, ३५० डिटोनेटर ताब्यात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -