घरट्रेंडिंगपाकिस्तानी पोलिसांचा जुगाड, चोरांना पकडण्यासाठी रोलर ब्लेडस

पाकिस्तानी पोलिसांचा जुगाड, चोरांना पकडण्यासाठी रोलर ब्लेडस

Subscribe

गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडता यावे यासाठी पाकिस्तानी पोलिसांना एक नवीन कल्पना सुचली आहे. यासंबंधीचा व्हिडिओही सोशल मिडियावर बराच व्हायरल होत आहे.

पाकिस्तानमधील कराची पोलिसांनी चोरांना पकडण्यासाठी एक नवीन शक्कल लढवली आहे. चोरांना लवकरात लवकर पकडता येण्यासाठी पाकिस्तानी पोलिस आता रोलर ब्लेडसचा वापर करणार आहेत. याबद्दल माहिती देणारा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला होता. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पोलिस जवान रोलर ब्लेड्सवर चालताना दिसत आहे. चोर आणि रस्त्यावर येता जाता छेडछाड करणाऱ्या लोकांना लगेच पकडता यावे यासाठी या रोलर ब्लेडचा वापर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

एखादा गुन्हेगार हा चोरी करुन पळत असेल तर त्याला, रोलर ब्लेडच्या माध्यमातून सहज पकडता येवू शकते. या रोलर ब्लेड समूहासाठी ज्या लोकांची निवड करण्यात आली आहे, त्यांचा पहिल्याच दिवशी आव्हानात्मक सराव करुन घेण्यात आला होता. यामध्ये २० जणांची जागा असून १० पुरुष आणि १० महिला पोलिसअधिकारी यांचा त्यात समावेश आहे. या नव्या समुहाचे मुख्य फारुक अली आहेत. त्यांच्या म्हण्यानुसार, आपल्याला रस्त्यावर वाढत चाललेल्या गुन्ह्यांना थांबवण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळा विचार करण्याची गरज आहे. आता पोलिस बाईकवर चालणाऱ्या चोरांनाही अगदी सोप्या पद्दतीने पकडू शकतात. असे फारुक अली म्हणाले.


हे वाचा- हत्येप्रकरणी पोलिसांनी कोंबड्याला केली अटक, कोर्टात होणार सुनावणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -