घरमुंबई“मोहन डेलकर हिंमतबाज होते, पळपुटे नव्हते, ते आत्महत्या का करतील?”

“मोहन डेलकर हिंमतबाज होते, पळपुटे नव्हते, ते आत्महत्या का करतील?”

Subscribe

सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावर राऊतांचा थेट सवाल

सिल्वासा, दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह मुंबईतील एका हॉटेलमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा सध्या माध्यमांमधून सुरू आहे. दरम्यान, डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. याप्रकरणावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावर भाष्य करत अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला आहे.

‘मोहन डेलकर हे सात वेळा लोकसभा निवडणूक जिंकले. दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात त्यांचा दबदबा होता. एक हिंमतबाज लढवय्या नेता अशी त्यांची ओळख असताना डेलकरांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. त्यांचा मृत्यू संशयास्पद आहे. लोकसभेत तरी डेलकरांना न्याय मिळेल काय?’ असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थितीत करत भाजपवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

मोहन डेलकर हे दबंग नेता

सुसाईड नोटचा हवाला देत संजय राऊत यांनी असा दावा केला आहे की, “मोहन डेलकर हे हिंमतबाज होते, ते पळपुटे नव्हते. ते आत्महत्या का करतील? त्यांना जय-पराजयाची चिंता कधीच वाटली नाही. अशा डेलकरांचा मृतदेह मुंबईतील हॉटेलात फासावर लटकलेला आढळतो व सगळे चूप आहेत. एका नटाची आत्महत्या खळबळ माजवते, एका नटीचे बेकायदेशीर बांधकाम तोडल्यावर हलकल्लोळ होतो, पण सातवेळा निवडून आलेले एक खासदार मुंबईत संशयास्पदरीत्या मृत पावतात त्यावर कोणी काहीच आपटायला तयार नाही. मोहन डेलकर यांनी एक ‘सुसाईड नोट’ गुजरातीत लिहून ठेवली. ही नोट खरी असेल तर त्यात डेलकरांनी नक्की काय लिहिले? दादरा-नगर हवेलीचे प्रशासक डेलकरांचा छळ करीत होते, भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांच्यावर दबाव होता असे त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.”

सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याची ‘पटकथा’

यावेळी संजय राऊत यांनी आपली रोखठोक भूमिका मांडताना असा सवालही उपस्थितीत केली की, “सिल्वासा, दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहनभाई डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. अभिनेता सुशांत राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात ज्यांनी देशभरात खळबळ माजवली त्या प्रत्येकासाठी डेलकरांची आत्महत्या हे आव्हान आहे. मोहन डेलकरांची आत्महत्या हे साधे प्रकरण वाटत नाही. सुशांत राजपूतने त्याच्या एका सिनेमात ‘आत्महत्या करू नये. निराश होऊ नये,’ असे संवाद फेकले. त्यामुळे सुशांतसारखा खंबीर मनाचा तरुण आत्महत्या कसा करील? सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याची ‘पटकथा’ तयार झाली. त्या कथाकारांना डेलकरांच्या आत्महत्येमागे कोणतेच काळेबेरे दिसू नये? डेलकर यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली, स्वतःचा अत्यंत दारुण शेवट त्यांनी करून घेतला याबद्दल किती जण हळहळले?”

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -