घरताज्या घडामोडीMaharashtra Budget Session Live Updates: अखेर विरोधकांनी सभात्याग केला

Maharashtra Budget Session Live Updates: अखेर विरोधकांनी सभात्याग केला

Subscribe

अखेर विरोधकांनी सभात्याग केला


संविधानाचा हक्क मागणं हा आमचा गुन्हा आहे का? – सुधीर मुनगंटीवार

- Advertisement -

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. सरकारविरोधात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.


राज्यातील आरोग्य सुविधांमध्ये झाली वाढ – राज्यपाल

- Advertisement -

कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्यांना राज्यपालांनी केलं वंदन


राज्यपालांच्या अभिभाषणाला सुरुवात झाली आहे.


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विधानभवनात दाखल झाले आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले असून त्यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे देखील आहेत. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.


अधिवेशनापूर्वी काय म्हणाले आशिष शेलार?

  • वरळी परिसरात कुणीही मागणी न करताना पब आणि बारला १ पर्यंत परवानगी दिली जाते
  • आता तर काही सुप्त शक्तीमुळे १ काय रात्रभर चालत आहेत
  • राजकीय नेतृत्वात पब पार्टी प्रबळ होत आहे
  • मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाला केराची टोपली त्यांचे मंत्री, नगरसेवक दाखवत आहेत
  • शिवजयंतीला गर्दी करू नका असे सांगतात आणि वरळीमध्ये रात्रभर पब बारमध्ये गर्दी जमा होत आहे
  • महापौरांनी त्यांच्या वॉर्डमध्ये होणाऱ्या गर्दीकडे लक्ष द्यावे

केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढली आहे. याचा निषेध म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज सोमवार दि. १ मार्च रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे मंत्री व सर्व आमदार सकाळी १० वा. मंत्रालया समोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकलवरून विधानभवनात येणार आहेत.


अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी २५ जणांचा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापैकी २३ पोलीस कर्मचारी असून २ पत्रकार पॉझिटिव्ह आले आहेत. अधिवेशनपूर्व ३२०० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली होती, यामधील २५ जणांचे कोरोना अहवाल सकारात्मक आले आहेत.


राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. १ ते १० मार्चपर्यंत असे दहा दिवसांचे अधिवेशन होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प ८ मार्चला सादर होणार आहे. तर ९ आणि १० मार्चला बजेटवर चर्चा होणार आहे.


हेही वाचा – अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१ : देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील २१ मुद्दे


 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -