घरमहाराष्ट्रशरद पवारांनी आज घेतली कोरोनाची लस

शरद पवारांनी आज घेतली कोरोनाची लस

Subscribe

कोरोना लसीकरणासाठी शरद पवार जेजे रुग्णालयात दाखल

आज देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात ४५ वर्षांवरील दुर्धर आजाराशी सामना करणाऱ्या रुग्णांना आणि ६० वर्षावरील नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. याचपार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतला. यानंतर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. या लसीकरणासाठी शरद पवार मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल झाले आहेत. यावेळी शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारही  पस्थित आहेत. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोव्हिशिल्ड लस टोचण्यात आली. यावेळी जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहानेही यावेळी उपस्थित होते. (NCP Chief Sharad Pawar take Covid 19 Vaccine in Mumbai)

 sharad pawar takes first shot of covid 19 vaccine at jj hospital in mumbai
शरद पवारांना घेतली सिरमची कोव्हिशिल्ड लस

शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. भारतात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड या लसी देण्यात येत आहेत.तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लस घेतली आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे देखील थोड्याच वेळापूर्वी जेजे रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. आज दुपारी २ वाजता जेजे रुग्णालयात लस घेतली.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस टोचून घेतली. स्वतः पंतप्रधानांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. कोरोना जागतिक महामारीमध्ये आपल्या डाॅक्टरांनी आणि शास्त्रज्ञांनी जे काम केले ते उल्लेखनीय असल्याचं सांगत पंतप्रधानांनी या सर्वांचं कौतुक केलं. जे आजपासू लस घेण्यास पात्र आहेत, त्या सर्वांनी लस घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मोदीनंतर आता देशातील अनेक बडे नेते जसे की गृहमंत्री अमित शहा, इतर राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि मंत्रिमंडळातील सदस्य लस घेणार आहेत. कोविड-१९ इंडिया ट्रॅकरनुसार, देशात आतापर्यंत १ कोटी ११ हजार १२ हजार ५६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतपर्यंत १ लाख ५७ हजार १९५ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी ७ लाख ८४ हजार ५६८ जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या १ लाख ६५ हजार ७१५ जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत १ कोटी ४३ लाख १ हजार २६६ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -