घरमुंबईआमच्यापासून अंबानींना कोणताही धोका नाही - जैश उल हिंद

आमच्यापासून अंबानींना कोणताही धोका नाही – जैश उल हिंद

Subscribe

ही पोस्ट मुकेश अंबानी यांना धमकावणाऱ्या जैश-उल-हिंदचे असल्याचा दावा करत रविवारी सकाळपासूनच माध्यमात एका पोस्टची चर्चा सुरू होती.

जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेने मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यास नकार दिला आहे. यापूर्वी असे म्हटले जात होते की, जैश-उल-हिंद या संघटनेनी अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची जबाबदारी घेतली आहे, मात्र आता या दहशतवादी संघटनेनी ही जबाबदारी नाकारल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी जैश-उल-हिंदची पोस्ट अधिकृतपणे शेअर केली आहे. या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, त्यांनी अंबानींना कधीही धमकावले नाही आणि माध्यमांतून प्रसिद्ध केलेले पत्र किंवा चिठ्ठी बनावट आहे. जैश-उल-हिंदच्या पोस्टमधून असा दावा केला जात आहे की, ते काफीरांकडून कधीच पैसे घेत नाहीत यासह भारतीय उद्योजकांच्या कधीही वाकड्यात जाणार नाही. यासह ते असेही म्हणाले की, आमच्यापासून अंबानींना कोणताही धोका नाही.

- Advertisement -

ही पोस्ट मुकेश अंबानी यांना धमकावणाऱ्या जैश-उल-हिंदचे असल्याचा दावा करत रविवारी सकाळपासूनच माध्यमात एका पोस्टची चर्चा सुरू होती. मात्र आता मुंबई पोलिसांनी जैश-उल-हिंदचे अधिकृत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टचे शीर्षक असे लिहिले आहे की, ‘जैश-उल-हिंदकडून अंबानींना कोणताही धोका नाही’.

असे म्हटले आहे या पोस्टमध्ये

जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेने लिहिले आहे की, आम्ही कधीच काफिरांकडून पैसे मागणार नाही. कोणत्याही भारतीय व्यावसायिकांशी आमचा वाद नाही. आमचा वाद भाजप आणि आरएसएस विरोधात आहे. भारतात राहणाऱ्या मुस्लिमांवरील नरेंद्र मोदींद्वारे केल्या जाणाऱ्या अत्याचाराविरूद्ध आमचा लढा आहे.

- Advertisement -

अंबानींना धमकीचं पत्र

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडल्यानंतर मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचे समोर आले आहे. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या पत्रात असे लिहिले आहे की, “नीता भाभी आणि मुकेश भैय्या कुटुंबीय, ही तर एक झलक आहे. पुढच्या वेळी हे सामान पूर्ण येईल आणि संपूर्ण कुटुंबाला उडवून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, काळजी घ्या.” वृत्तसंस्थेने पोलीस सुत्रांच्या हवाल्याने असे सांगितले की, कार पार्क करणाऱ्या एका व्यक्तीने साधारण एक महिन्यासाठी त्या परिसराची रेकी केली होती.

असे म्हटले होते धमकीच्या पत्रात…

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर पार्क केलेल्या गाडीत स्फोटकांच्या बॅगसोबत एक पत्रही पोलिसांनी मिळाले. या पत्रातून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे. ‘डियर नीता भाभी और मुकेश भैय्या और फॅमिली.. ये तो सिर्फ ट्रेलर है अगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे फॅमिली को उडाने….संभल जाना…’, असा मजकूर या पत्रात असल्याचे समजते.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -