घरमहाराष्ट्रनाशिकराज ठाकरे गुरुवारी नाशिक दौर्‍यावर

राज ठाकरे गुरुवारी नाशिक दौर्‍यावर

Subscribe

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टांच्या विवाह सोहळ्यानिम्मित मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी (दि.४) नाशिक दौर्‍यावर येणार असून, कोरोना पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचा सूचना दिलेल्या आहेत. नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, मनविसे जिल्हाध्यक्ष शाम गोहाड यांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली.
मनसेच्या स्थापनेपासून नाशिककरांनी राज ठाकरे यांना साथ दिली आहे. नाशिकमधून मनसेचे तीन आमदार आणि महापालिकेची सत्ता देत नाशिककरांनी राज ठाकरे यांना डोक्यावर घेतले होते. परंतु, स्थानिक पदाधिकार्‍यांमधील वर्चस्ववाद, गटबाजी आणि माजी आमदार वसंत गिते यांच्यासह काही पदाधिकार्‍यांनी सोडचिठ्ठी दिल्यामुळे मनसेची अल्पावधीतच वाताहत झाली. गत पंचवार्षिकमधील मनसे नगरसेवकांची संख्ख्या ४० ची संख्या या पंचवार्षिकमध्ये जेमतेम पाचवर आली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या गुरुवारी ते नाशिक दौर्‍यावर येत असून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या नातेवाईकांच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने पक्ष पदाधिकार्‍यांचीही ते बैठक घेणार असून, पक्ष संघटना मजबूत करण्यासंदर्भात काय सूचना देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -