घरमुंबईविधानसभेत हाय व्होल्टेज ड्रामा भाजप आमदाराचा गॅलरीतून उडी मारण्याचा प्रयत्न

विधानसभेत हाय व्होल्टेज ड्रामा भाजप आमदाराचा गॅलरीतून उडी मारण्याचा प्रयत्न

Subscribe

धुर्वे यांनी अधिकार्‍याला निलंबित करा नाहीतर विधानसभा गॅलरीतून उडी मारतो, अशी धमकी देत गॅलरीच्या कठड्यापर्यंत येऊन त्यासाठी केलेल्या प्रयत्नाने सभागृह हादरले.

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नगरपरिषदेतील गैरव्यवहारप्रकरणी संबंधित लोकांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतरही समाधान न झालेल्या भाजप आमदार संदीप धुर्वे यांनी मंगळवारी विधानसभा गॅलरीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला.

धुर्वे यांनी अधिकार्‍याला निलंबित करा नाहीतर विधानसभा गॅलरीतून उडी मारतो, अशी धमकी देत गॅलरीच्या कठड्यापर्यंत येऊन त्यासाठी केलेल्या प्रयत्नाने सभागृह हादरले. सभागृहात आर्णी नगरपरिषदेचा तारांकित प्रश्न धुर्वे यांनी मांडला होता. यावर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आर्णी नगरपरिषदेतील प्रश्नावर उत्तर सुरू केले.

- Advertisement -

त्याचवेळी दुसरीकडे संदीप धुर्वे यांनी माझे म्हणणे ऐकून घ्या, नाहीतर गॅलरीतून उडी मारेन, अशी धमकी दिली. ते उडी मारण्यासाठी सभागृह गॅलरीच्या कठड्यापर्यंत आले. यावेळी अन्य भाजप आमदारांनी त्यांना परावृत्त करायचे सोडून उलट धुर्वे यांना त्यासाठी प्रोत्साहनच दिले. यावेळी संतप्त झालेल्या उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी तुमच्या प्रतिनिधीला शांत करा, अशा सूचना भाजप नेत्यांना दिल्या.

धुर्वे यांच्यावर कारवाई करा
काँग्रेस सदस्य नाना पटोले यांनी ही सभागृहाची शिस्त आहे का, याला सभागृह म्हणतात का? असा सवाल करत अशा आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्याच वेळी संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सदस्य उडी मारण्याचा प्रयत्न करताहेत. आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. आपण कारवाई करणार का?असा सवाल उपाध्यक्षांना केला. अखेर धुर्वे यांना, यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागले. मी उडी मारणार नव्हतो. केवळ आर्णी नगरपरिषदेच्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करण्याची माझी मागणी होती. आपले लक्ष वेधण्यासाठी मी आवाज देत होतो, असे धुर्वे म्हणाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -