घरताज्या घडामोडीBBC live शोमध्ये पंतप्रधान मोदींच्या आईबद्दल अपशब्द, जगभरातून संताप

BBC live शोमध्ये पंतप्रधान मोदींच्या आईबद्दल अपशब्द, जगभरातून संताप

Subscribe

ब्रिटनमध्ये बीबीसी एशियाई नेटवर्कच्या 'बिग डिबेट' या रेडिओ शोमध्ये एकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले. यामुळे जगभरातून संताप व्यक्त होत आहे.

ब्रिटनमध्ये बीबीसी एशियाई नेटवर्कच्या ‘बिग डिबेट’ या रेडिओ शोमध्ये एकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले. यामुळे जगभरातून संताप व्यक्त होत आहे. तसेच सोशल मिडियावर बीबीसीवर बहिष्कार घाला असा ट्रेंडही सुरू झाला आहे. (boycott BBC)

या शोमध्ये शीख समुदाय आणि भारतातील वंशभेद या विषयावर चर्चात्मक कार्यक्रमाचे लाईव्ह आयोजन करण्यात आले होते. मात्र चर्चेदरम्यान सध्या भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आला आणि त्यावर फोनवरून लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियाही येऊ लागल्या. याचदरम्यान, एका व्यक्तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईबदद्ल अपशब्द वापरले. पण त्यावर सूत्रधार महिलेनेही संबंधित व्यक्तीला अडवले नाही. कार्यक्रम लाईव्ह असल्याने ऑडिओ व्हायरल झाला. त्यानंतर जगभरातून या घटनेची निंदा करण्यात येत आहे. तसेच बीबीसीने संबंधित व्यक्तीचे आपत्तीजनक संवाद ऑन एअर का जाऊ दिले असा प्रश्न अनेकांनी विचारला असून बीबीसीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

तर  बीबीसीने कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींची माहिती घेतली नव्हती का, की जाणीवपूर्वक त्यांना या कार्यक्रमात शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आणायचा होता. असे प्रश्न अनेकजण विचारत आहेत.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -