घरठाणेमुंब्रा येथे पत्नीकडून पतीची हत्या

मुंब्रा येथे पत्नीकडून पतीची हत्या

Subscribe

पत्नीच्या प्रियकरासह मेव्हणीला मुंब्रा पोलिसांनी केली अटक

मुंब्रा मित्तल मैदानकडून एमईमव्हॅलीकडे जाणाऱ्या खाडीच्या जुन्या पुला नजिक नाल्यावर 27 फेब्रुवारीला रात्री कौसा येथील तरुणाची गळा चिरून निर्घृणपणे हत्या झाली होती. या हत्येचा उलगडा झाला असून या हत्येप्रकरणी पत्नीसह तिचा प्रियकर आणि त्याच्या मेव्हणीला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे.

कौसा अमृत नगर येथे राहणारे मृत्यू झालेला अहमद दाऊद शेख (34) त्याचा बालपणीचा मित्र मोहम्मद नफिज शेख हे जरीच्या कारखान्यात काम करीत होते, ते शेजारी राहत होते, अहमद शेख यांची पत्नी रुक्साना हिचे अहमदचा मित्र नफिज याच्या बरोबर अनैतिक संबंध होते. अहमदच्या हे लक्षात आल्यावर त्याने अनैतिक संबंधांना विरोध केला होता. या वरून पती पत्नीमध्ये नेहमी भांडण होत असे. यातून अहमद आपल्या पत्नीला सिमला पार्क येथे राहण्यासाठी घेऊन गेला होता. पती अनैतिक संबंधांना अडसर ठरतो म्हणून रूकसानाने आपल्या प्रियकराच्या आणि बहीण रेश्माच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला.अहमदला दारू पिण्यासाठी नाफीजने जुन्या खाडीपुलाजवळील गटाराच्या कडेला बोलावले. नाफीजने स्वतःकमी दारू पिऊन अहमदला जास्त दारू पाजली.

- Advertisement -

अहमद दारूच्या नशेत आल्यावर उलटी करण्यासाठी गटाराच्या कठड्यावर बसला असता पाठीमागून येऊन नफिजने त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्रने वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली. त्याला गटारात ढकलून दिले. या हत्येचा तपास करण्यासाठी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांच्या मदतीने मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी एक शोधपथक तयार केले होते.

हे पथक आरोपीचा मुंब्रा परिसरात शोध घेत असताना आणि फोनवरील संभाषण तपासत असताना पत्नीवर पोलिसांना संशय आला. त्यानुसार त्यांना ताब्यात घेतले असता प्रियकर आणि बहिणीच्या मदतीने पतीच्या खुनाचा खुनाचा कट आखल्याचे तिने कबूल केले. त्यानुसार मुंब्रा पोलिसांनी मृत अहमदची पत्नी रूकसाना शेख (30) तिचा प्रियकर मोहम्मद नफिज शेख (33) आणि मृत अहमदची मेव्हणी रेश्मा मेहबूब सय्यद (28) यांना अटक केली. या संदर्भात कळवा सहाययक पोलीस आयुक्त नीता पाडवी अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -