घरताज्या घडामोडीRTOच्या 'या' १८ सेवा मिळणार आता ऑनलाईन

RTOच्या ‘या’ १८ सेवा मिळणार आता ऑनलाईन

Subscribe

ओरटीओमधून लाईसन्स, गाडी परवानासंबंधीत अनेक काम करुन घ्यायची झाल्यास १०० वेळा फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र आता RTO चा कारभार ऑनलाईन होत असल्याने नागरिकांचा वेळ आणि परिश्रम वाचले आहेत. यातच आरटीओतून आता वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी ओरटीओ कार्यालय गाठण्याची गरज भासणार नाही. कारण RTOने नागरिकांसाठी १८ सेवा आता ऑनलाइन देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचे नवे परिपत्रक रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकतेच जाहीर केले. या परिपत्रकात आरटीओकडून ऑनलाईन देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आता ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स आणि नोंदणी प्रमाणपत्र (RC Book) आधार कार्डशी जोडावा लागणार आहे. यानंतर आधार कार्ड पडताळणीद्वारे नागरिकांना ऑनलाईन सेवा मिळू शकणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आता आरटीओ कार्यालयातील गर्दीपासून सुटका मिळणार आहे. नागरिकांना आधार लिंक पडताळणीसह घरी बसून या सेवांचा लाभ घेता येणार आहे.

- Advertisement -

त्यामुळे आता वाहन चालविण्याचा परवाना आणि वाहन नोंदणी ऑनलाइन झाल्याने नागरिकांना इतर कोणतीही कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही. यासाठी नागरिकांना parivahan.gov.in वर जाऊन आपले ‘आधार कार्ड’ व्हेरिफाय करण्याची गरज आहे. त्यानंतर आपण या सर्व १८ सुविधांचा वापर घेऊ शकता. एकदाका तुमचे आधार पडताळणी झाली की तुम्ही, लर्निंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स रिनिव्ह, डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणीचा ड्रायव्हिंग लायसन्स अ‍ॅड्रेस प्रमाणपत्र बदलणे, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट देणे, परवान्यामधील वाहन श्रेणी शरण करणे, कोणत्याही मोटार वाहनासाठी तात्पुरती नोंदणीसाठी अर्ज, संपूर्ण बॉडी बनवलेल्या वाहनांची नोंदणी, मोटार वाहनांच्या मालकीच्या हस्तांतरणाची नोटीस, नोंदणी प्रमाणपत्रात पत्ता बदलल्याची सूचना, डुप्लिकेट नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज, एनओसीसाठी नोंदणी प्रमाणपत्र अर्ज, मान्यता प्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरच्या नोंदणीसाठी अर्ज
राजनैतिक अधिकाऱ्या (Diplomatic officer) च्या मोटार वाहन नोंदणीसाठी अर्ज, राजनैतिक अधिकाऱ्या (Diplomatic officer) च्या मोटार वाहनासाठी नवीन नोंदणी चिन्हांच्या असाइनमेंटसाठी अर्ज, खरेदी कराराला मान्यता देता येणार अशा एकुण १८ सेवांचा लाभ घेता येणार आहे.

 

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -