घरठाणेशब ए मेराज, शब ए बारात साध्या पद्धतीने साजरा करा

शब ए मेराज, शब ए बारात साध्या पद्धतीने साजरा करा

Subscribe

ठाणे महापौर आणि आयुक्तांचे आवाहन

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी शब ए मेराज व शब ए बारात उत्सव अत्यंत साधा पद्धतीने साजरा करून राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे.

कोविड १९ च्या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता या वर्षी शब ए मेराज व शब ए बारात उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. यासाठी शासनाच्यावतीने मार्गदर्शन सूचना देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

शब ए मेराज व शब ए बारात निमित्त सर्व मुस्लीम धर्मीय बांधव आपआपल्या विभागातील मशिदीत रात्रभर नमाज, कुराण व दुवा पठण करतात. त्यामुळे बहुसंख्य मुस्लीम वस्तीत रात्रभर मुस्लीम बांधवांची वर्दळ असते. तसेच काही ठिकाणी वाझ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कोविड १९ च्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे ११ मार्च रोजीची रात्र आणि १२ मार्च २०२१ ची पहाट या कालावधीत शब ए मेराज ( चंद्रदर्शनावर अवलंबून ) आणि २८ मार्च रोजीची रात्र आणि २९ मार्च , २०२१ ची पहाट या कालावधीत ( चंद्रदर्शनावर अवलंबून ) येणाऱ्या शब ए बारात या उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे मिरवणुकांचे आयोजन न करता मशिदीत अथवा घरातच दुवा पठण करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

शब ए मेराज व शब ए बारात निमित्त स्थानिक मशिदीत नमाज पठणाकरीता येणाऱ्या मुस्लीम बांधवांनी कोणत्याही प्रकारची गर्दी न करता एका वेळी ४० ते ५० व्यक्तींनी टप्याटप्याने सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करावे. मास्कचा वापर करून दुवा पठण करावे. मशिदीतील व्यवस्थापक यांनी मशिद व आजूबाजूच्या परिसरात निर्जंतुकीकरणाची व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेच्या नियमांचे पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. शब ए मेराज व शब ए बारात दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या वाझ कार्यक्रमाचे आयोजन शक्यतो बंदीस्त जागेत करावे. परंतू खुल्या जागेत आयोजन केल्यास कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही. तसेच त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन होईल याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -