घरदेश-विदेशदेशात महाराष्ट्रात सर्वाधिक कुटुंब करोडपती, शहरात मुंबईचा क्रमांक पहिला

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कुटुंब करोडपती, शहरात मुंबईचा क्रमांक पहिला

Subscribe

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कुटुंब करोडपती असल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. देशात ४.१२ लाख ‘डॉलर्स-मिलिनेअर’ (२ कोटी ९८ लाख ९५ हजार ३३८) कुटुंबे आहेत. (ज्यांची मालमत्ता ७ कोटींपेक्षा जास्त आहे.) महाराष्ट्रात सर्वाधिक ५६,००० कुटुंब ही करोडपती आहेत. हुरुन इंडियाज वेल्थ रिपोर्ट – २०२० नुसार महाराष्ट्रानंतर सर्वाधिक करोडपती कुटुंब उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरातमध्ये राहतात. देशातील एकूण करोडपती कुटुंबांपैकी ४६ टक्के या पाच राज्यात राहतात.

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १० लाख डॉलर्सपेक्षा जास्त आहे, त्यांना डॉलर्स-मिलिनेअर कुटुंब म्हणतात. देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जीएसडीपी आहे आणि देशाच्या जीडीपीमध्ये त्याचं योगदान सुमारे १६ टक्के आहे. राज्याची अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष २०१३ ते २०१९ दरम्यान दरवर्षी ६.९ टक्के दराने वाढली. तसंच महाराष्ट्रात २४७ श्रीमंत लोक आहेत.

- Advertisement -

मुंबईचा पहिला क्रमांक

शहरांबद्दल सांगायचं तर मुंबईत जास्तीत जास्त १६,९३३ डॉलर्स-मिलिनेअर कुटुंब राहतात. दिल्ली १५,८६१ कुटुंबांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे तर १०,००० सह कोलकाता तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर, बंगळुरु (७,५८२) चौथ्या तर चेन्नई (४,६८५) ५ व्या स्थानावर आहे.

उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर

करोडपती कुटुंबांच्या यादीत देशात उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशातील करोडपती कुटुंबांची संख्या ३६,००० आहे. राज्याची अर्थव्यवस्था गेल्या दशकात १०.६ टक्के दराने वाढत आहे. या यादीतील तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आहे. तामिळनाडूमध्ये ३५,००० करोडपती कुटुंबे राहतात.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -