घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशेतजमीनींचे लिलाव अखेर स्थगित, बळीराजाला दिलासा

शेतजमीनींचे लिलाव अखेर स्थगित, बळीराजाला दिलासा

Subscribe

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नियोजित केले होते लिलाव

येवला – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त होताच बँकेची कर्जवसुलीही मंदावली आहे. येवला येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नियोजित केलेले शेतजमीन लिलाव जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मध्यस्थीने व शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे स्थगित करण्यात आले. यामुळे बळीराजाला दिलासा तर मिळाला आहे. मात्र, वसुलीची मदार आता प्रशासकांवरच राहणार असल्याचे दिसते.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांच्या शेतजमिनीचे लिलाव नाशिकला करण्याचे निश्चित करून शेतकर्‍यांना धडकी भरवली होती. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतजमिनीचे लिलाव करून शेतकर्‍यांना देशोधडीला लावणार का, असा प्रश्न शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देऊन उपस्थित केला होता. जिल्हाधिकारी मांढरे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन संबंधितांकडून त्वरित अहवाल मागण्याचे सूचित केले होते. भद्रकाली पोलीस ठाण्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी शेवाळे व सहकारी आणि शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडेंसह मोजके प्रतिनिधी यांच्याशी सकारात्मक चर्चा होऊन, आजचे शेतजमिनीचे लिलाव स्थगित झाल्याचे पत्र नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी शेवाळे यांनी दिल्या. याप्रसंगी अर्जुन बोराडे, संतू पाटील झांबरे, रामकृष्ण बोंबले, शंकरराव पूरकर, शंकरराव ढिकले, बाळासाहेब गायकवाड, अरुण जाधव, बापूसाहेब पगारे, श्रावण देवरे आणि थकबाकीदार शेतकरी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -