घरताज्या घडामोडीघाटकोपर येथे हॉटेल, खाऊगल्ल्या, पानटपऱ्या ३१ मार्चपर्यंत बंद

घाटकोपर येथे हॉटेल, खाऊगल्ल्या, पानटपऱ्या ३१ मार्चपर्यंत बंद

Subscribe

पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत घाटकोपर (पूर्व) येथील काही व्यापारी बांधवांनी स्वतःहून ३१ मार्चपर्यंत दुकाने, पानाच्या टपऱ्या, स्टॉल, हॉटेल व फेरीवाला व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. तर दुसरीकडे पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत घाटकोपर (पूर्व) येथील काही व्यापारी बांधवांनी स्वतःहून ३१ मार्चपर्यंत दुकाने, पानाच्या टपऱ्या, स्टॉल, हॉटेल व फेरीवाला व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.गेल्या दीड महिन्यात मुंबईत कोरोनामुळे २०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर ठोस औषध अद्यापही उपलब्ध झालेले नाही. मात्र जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण केले जात आहे. पालिका कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी रुग्णालयीन उपचाराबरोबरच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगाही उगारत आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी जनजागृतीही करण्यात येत आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येने ५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. पालिकेच्या आवाहनाला घाटकोपर ( पूर्व), राजावाडी परिसरातील व्यापारी बांधव, फेरीवाले, स्टॉलधारक, दुकानदार आदींनी सकारत्मक प्रतिसाद देत बुधवारपासून स्वतःहुन ३१ मार्चपर्यंत खाऊगल्ल्याहॉटेल्स, स्टॉलपानाच्या टपऱ्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहेघाटकोपरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ होत आहे. विशेषतः घाटकोपर पूर्व भागात रुग्ण वाढत आहेत. गेल्या २४ तासात तर कोरोनाचे २९२ नवे रुग्ण सापडले. ९६  फेरीवाल्यांच्या चाचण्या केल्या असता त्यापैकी ९ जण आणि मॉलबाहेर राबवण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ७ जण असे १६ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. तर गेल्या दोन दिवसांपासून एनविभाग कार्यालयात केलेल्या चाचण्यांमध्ये ४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

- Advertisement -

ही सर्व परिस्थिती पाहता, कोरोनाच्या या लढ्यात सर्वसामान्य आणि स्थानिक दुकानदार, व्यापारी यांचाही सहभाग असेल तर ही लढाई जिंकता येईल, असे आवाहन एन वार्डचे साहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी घाटकोपर (पूर्व) राजावाडी, पंतनगर आदी भागातील दुकानदार, व्यापारी, हॉटेल्स, फेरीवाले यांना केले होते. यावेळी, त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी बैठक घेऊन कोरोनाबाबत व त्यामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीबाबत त्यांचेही प्रबोधन केले आणि सहकार्य करण्याची विनंती केली. त्यास चांगला प्रतिसाद लाभला आणि घाटकोपर ( पूर्व) भागात व्यापारी बांधवांनी स्वेच्छेने आपले व्यवहार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा – हिंदमाता परिसर पूरमुक्त करण्यासाठी १५० कोटींचे विना टेंडर कंत्राट!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -