घरठाणेकल्याण : एक शहर, दो खासदार! दो आमदार!

कल्याण : एक शहर, दो खासदार! दो आमदार!

Subscribe

कल्याण हे महाराष्ट्रातील मुंबईचा अपवाद वगळता एकमेव असे शहर आहे. ज्या शहराला दोन खासदार अन् दोन आमदार लाभलेले आहेत. या शहरांचे विभाजन दोन लोकसभा व दोन विधानसभा मतदार संघात होते.

कल्याण हे महाराष्ट्रातील मुंबईचा अपवाद वगळता एकमेव असे शहर आहे. ज्या शहराला दोन खासदार अन् दोन आमदार लाभलेले आहेत. या शहरांचे विभाजन दोन लोकसभा व दोन विधानसभा मतदार संघात होते. भिवंडी लोकसभा मतदार संघात कल्याण शहरातील विकसीत अशा खडकपाडा, आधारवाडी, बेतुरकरपाडा, गौरीपाडा, मुरबाडरोड, शहाड या भागांचा समावेश होतो. तर कल्याण लोकसभा मतदार संघात कल्याण पुर्वेतील नेतीवली, पिसवली, काटेमानिवली, चिंचपाडा, कोळसेवाडी, आनंदनगर, वालधुनी जरीमरीनगर या भागांचा समावेश होतो. सध्या कल्याण लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार आहेत. ते शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे व भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत. ते भाजपचे कपिल पाटील एकाच शहराचे दिल्लीत गर्हाणे मांडणारे हे दोन तुल्यबळ नेते डॉ. श्रीकांत शिंदे हे शिवसेनेचे सर्वात ताकदवान समजले जाणारे नेते एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र होत.

डॉ. श्रीकांत शिंदे यांना राजकारणाचा कपिल पाटील यांच्यापेक्षा कमी अनुभव असला तरी एकनाथ शिंदे सारख्या दिग्गज पिताश्रींच्या अनुभवाची शिदोरी गाठिशी आहे. डॉ. श्रीकांतशिंदे यांच्या मतदार संघात शहराचा जो भाग येतो त्या भागात भाजपचे आमदार गणपत शेठ गायकवाड तर कपिल पाटील शहरातील ज्या भागाचे प्रतिनिधीत्व करतात त्या भागात शिवसेनेचे आत्माराम भोईर हे आमदार आहेत. गणपतशेठ गायकवाड आणि आत्माराम भोईर हे दोघेही कल्याणातील स्थानिक ताकदवर नेते आहेत. एकाच शहराच्या पुर्व भागात खासदार सेनेचा तर आमदार भाजपचा तर याउलट पश्चिम भागात खासदार भाजपचा तर आमदार सेनेचा. वास्तविक कल्याण शहराने कायमच शिवसेना-भाजप या पक्षांना साथ दिलेली आहे.

- Advertisement -

मात्र काही दिववसांपासून ’दोस्त दोस्त न रहा…, और दुनिया जिनकी दोस्तीकी कसम खाया करते थे वो दोस्ती भी न रही’, मागील दोन वर्षापासुनचे दोन्ही पक्षातील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. या दोन पक्षातील वैर शहर विकासाला तारक ठरणार की मारक ठरणार हे येणारा काळच ठरवेल. या शहरात कायमच चढाओढीचे राजकारण होत आले आहे. आपणच कसे कार्यसम्राट आहोत हे दाखवताना चढाओढीचे पतंग उडविताना या नेत्यांना अनेकवेळा या शहराने पाहिले आहे. भुमीपूजन असो वा उद्घाटन त्या प्रसंगाचा मोठा इव्हेंट केल्याशिवाय कार्यक्रम संपन्न होत नाही. जे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हायला पाहिजेत ते होत नाहीत. ते पूर्ण न झाल्याने अनेक दिवस शहरवासियांचे हाल होताहेत, किमान ते प्रकल्प पूर्ण झाल्यावर तरी वेळेत लोकसेवेसाठी खुले करावेत ना, पण तसे होताना दिसत नाही.

कल्याण शहर हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. पंढरीच्या नामदेवाच्या पायरी इतकेच या शहराला पुर्वपार महत्व आहे. आगामी काळात हे शहर देशातील एक अग्रगण्य शहर होण्याची क्षमता बाळगून आहे. या शहरात विपुल प्रमाणात भौतिक व नैसर्गिक संसाधने उपलब्ध आहेत. या शहराला ऐतिहासिक वारसा बरोबरच खाडी किनारा, देशाच्या उत्तर-पूर्व भागात जाणारे लोहमार्ग, गुजरात, खान्देश, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागास जोडणारे महामार्ग, शहाड-अंबिवली-डोंबिवलीचा औद्योगीक पट्टा, तळी व नद्यांची खोरी, धरणातून होणारा विपुल पाणी पुरवठा, मुंबई, पुणे, नाशिक, नवी मुंबई दिड-दोन तासातील अंतर, कुशल वअकुशल कामगार व तंत्रज्ञांची रेलचेल, येऊ घातलेले मेट्रो व जलवाहतुक प्रकल्प. अशी अनुकूल परिस्थिती उपलब्ध आहे.

- Advertisement -

गरज आहे वरील संसाधनाचा वापर करुन विकासाचे राजकारण करण्याचा. या शहराजवळील भागात देश विदेशातील जे मोठे प्रकल्प येऊ पहात आहेत. अशांपैकी एक-दोन प्रकल्प मिळवण्याची या शहराला नामी संधी आहे. मेडिकल, तंत्रनिकेतन महाविद्यालये, विद्युत प्रकल्प, रेल्वे टर्रमिनल, जहाजबांधणी, अ‍ॅटो इंडस्ट्री उभारण्यासही वाव आहे. या शहरातून निवडून येणार्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला काम करण्याची व या शहराच्या विकासाला हातभार लावण्याची सुवर्णसंधी आहे. येऊ घातलेल्या आगामी महापालिकांच्या निवडणुकीत वरील चारही नेत्यांच्या कामगिरीची मोहर उमठणार आहे. महापालिकेत खरी लढत सेना-भाजपात असल्याने या चारही दिग्गज नेत्यांचा कस लागणार आहे. या तुल्यबळ लढतीत जय कोणाचा होणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(रणधिर शिंदे – लेखक कल्याणचे वार्ताहर आहेत.)

हेही वाचा –

सनराइज रुग्णालय घोटाळ्यातून उभं; रुग्णालय आणि जागेच्या मालकांना अटक करा- किरीट सोमय्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -