घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यात कोरोना मृतांची संख्या वाढली, २४ तासात ३१ हजार...

Maharashtra Corona Update: राज्यात कोरोना मृतांची संख्या वाढली, २४ तासात ३१ हजार ६४३ कोरोनाबाधितांची नोंद

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासात ५८८८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या (Maharashtra Corona Update) झपाट्याने वाढत आहे. रविवारी एकाच दिवसात ४० हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. परंतु सोमवारी गेल्या २४ तासात ३१ हजार ६४३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर २० हजारपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासात १०२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकाच दिवशी २०,८५४ कोरोबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले तसेच आतापर्यंत एकूण २३,५३,३०७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील बरे होण्याचे प्रमाण हे ८५.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे तर राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के एवढा आहे.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ९४ लाख ९५ हजार १८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७ लाख ४५ हजार ५१८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६ लाख ७ हजार ४१५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये तर १६ हजार ६१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण ३ लाख ३६ हजार ५८४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज राज्यात ३१,६४३ नवीन रुग्णाांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधधत रुग्णाांची एकूण
सांख्या २७,४५,५१८ झाली आहे.

- Advertisement -

मुंबईत कोरोनाचा उद्रेक

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गेल्या २४ तासात मुंबईत ५८८८ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत एकूण ४ लाख ४५ हजार ५६२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी २४ तासात १२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचा बरा होण्याचा दर ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर एकूण ४७,४५३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. मुंबईत कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या असून आज ३३ हजार ९६६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून आतापर्यंत ४ कोटी १ लाख ७ हजार ३१६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -