Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई ब्रिटिशकालीन तोफांचे रुपडं महापालिका पालटणार, लवकरच मिळणार नवी झळाळी

ब्रिटिशकालीन तोफांचे रुपडं महापालिका पालटणार, लवकरच मिळणार नवी झळाळी

'ईस्ट इंडिया कंपनी'च्या काळातील म्हणजे १६४ वर्षांपूर्वीच्या दोन तोफा या आकर्षणाचा केंद्रबिंदू

Related Story

- Advertisement -

मुंबईसह देशावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात मुंबईच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आलेल्या आणि सध्या घाटकोपर ( पूर्व) येथील उद्यानात ठेवण्यात आलेल्या दोन तोफांना लवकरच नवीन झळाळी देण्यात येणार आहे. कधीकाळी मुंबईचे संरक्षण करणाऱ्या या तोफा आता महापालिकेच्या उद्यानांचे सौंदर्य अधिक वाढविण्यास सहाय्यभूत ठरणार आहेत. घाटकोपर (पूर्व) परिसरातील ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’ हे सन १९७१ पासून मुंबईकरांच्या सेवेत असणारे उद्यान आहे. ५५ हजार ८४३ चौरस फुटांच्या जागेत विकसित विस्तारलेल्या या उद्यानात हिरवाई सोबतच ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या काळातील म्हणजे १६४ वर्षांपूर्वीच्या दोन तोफा या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत.

या दोन्ही तोफांची लांबी ३.१० मीटर असून तोफांचा आतील घेर हा ०.६४ मिटर आणि बाहेरील घेर १.१७ मीटर इतका आहे. ३ मीटर लांबीच्या दोन्ही तोफांवर सन १८५६ ची नोंद आहे. मुंबई महापालिकेच्या घाटकोपर (पूर्व) येथील उद्यानात या तोफांना नवीन रूप दिल्यावर पुनर्स्थापित करण्यात येणार आहेत. समुद्राने वेढलेल्या मुंबई नगरीचे संरक्षण करण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी तोफा बसविल्या होत्या. यापैकी तब्बल १६४ वर्षे जुन्या असणाऱ्या, पण तरीही भरभक्कम असणाऱ्या दोन पोलादी तोफा महापालिकेच्या घाटकोपर परिसरात असणाऱ्या ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये आहेत. या तोफांना एक नवी झळाळी मिळावी, या दृष्टीने या दोन्ही तोफा भव्य-दिव्य पद्धतीने पुन्हा स्थापित करण्याच्या प्रस्तावास अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी मंजुरी दिली आहे.

- Advertisement -

सदर प्रस्ताव पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी पुरातन वास्तू जतन अभियंता यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच घाटकोपर (पूर्व), टिळक पथावर असणाऱ्या ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’ मध्ये निसर्गाशी जवळीक साधण्यासोबतच तोफारुपी ऐतिहासिक ठेवाही अनुभवता येणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

- Advertisement -