घरठाणेनोकरीच्या नावाखाली तरुण तरुणींना फसवणाऱ्या प्लेसमेंटची पोलखोल

नोकरीच्या नावाखाली तरुण तरुणींना फसवणाऱ्या प्लेसमेंटची पोलखोल

Subscribe

'न्यू वर्क रिक्रुटमेंट' असे  बेरोजगार तरुणाची फसवणूक करणाऱ्या या कंपनीचे नाव आहे.

सोशल मीडियाचा आधार घेऊन बेरोजगार तरुण तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून हजारो रुपये उकळणाऱ्या ठाण्यातील एका प्लेसमेंट सर्व्हिसची पोलखोल करण्यात आली आहे. या प्लेसमेंट विरोधात सुमारे १८ ते २० तरुण तरुणीने नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज दाखल केला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नसून तपास सुरु असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली आहे.

‘न्यू वर्क रिक्रुटमेंट’ असे  बेरोजगार तरुणाची फसवणूक करणाऱ्या या कंपनीचे नाव आहे. या कंपनीचे कार्यालय  ठाणे पश्चिम रेल्वे स्थानका जवळील दादा पाटील रोडवरील एका इमारतीत आहे. या प्लेसमेन्ट कडून सोशल मीडियावर नोकरीचे संधी या नावाने जाहिरात करण्यात येत होती. या जाहिरातीला बळी पडलेल्या प्रत्येकी तरुणांकडून अडीज ते तीन हजार रुपये उकळण्याचे काम या कंपनीकडून करण्यात येत होते. मात्र कुठल्याही प्रकारची नोकरी या प्लेसमेंट कडून देण्यात येत नसल्यामुळे अनेक जणांची यामध्ये फसवणूक करण्यात आली आहे. पैसे परत मागण्यासाठी गेल्यावर या तरुणांनाच धमक्या देत असल्याची लेखी तक्रार फसवणूक झालेल्या २० जणांनी नौपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान ठाण्यातील समाज सेवक तुषार रसाळ यांनी फसवणूक झालेल्या तरुणांना न्याय मिळवणून देण्यासाठी या प्लेसमेंट विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली असून या तक्रारीची शहनिशा करण्यात येईल अशी माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी आपलं महानगरला दिली.

- Advertisement -

‘न्यू वर्क रिक्रुटमेंट’  हि प्लेसमेन्ट मागील तीन ते चार महिन्यापासून बेरोजगार तरुणाची फसवणूक करीत असून प्रत्येकी तरुणांकडून अडीज ते तीन हजार रुपये घेऊन त्यांना कुठल्याही प्रकारची नोकरी न देता त्याची फसवणूक केली जात असल्याची माहिती समाज सेवक तुषार रसाळ यांनी दिली. तसेच या प्लेसमेंट कडून दररोज ५० तरुणाची फसवणूक केली जात असल्याचा आरोप रसाळ यांनी केला आहे.


हेही वाचा – महाविकास आघाडीतील अजून एक नेता अडचणीत, महिलेचा बलात्काराचा आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -