घरठाणेठाणे जिल्ह्यात रेस्टोरंट, बारमध्ये मद्यविक्री बंद

ठाणे जिल्ह्यात रेस्टोरंट, बारमध्ये मद्यविक्री बंद

Subscribe

अबकारी कर भरण्यासाठी शासनाकडून सवलत नाकारल्यामुळे मद्यविक्री बंद

लॉकडाऊनमध्ये आर्थिक फटका बसलेल्या बियरबार मालकावरील अबकारी कर भरण्यासाठी शासनाकडून सवलत नाकारल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायिकांनी मद्यविक्रीवर बंदी आणण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला असल्याची माहिती ठाणे जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शैलेंद्र मौर्य यांनी पत्रकार परिषदेत दिली, तसेच याची अंमलबजावणी शुक्रवार रात्रीपासूनच करण्यात येणार आहे. लॉकडाउनच्या काळात हॉटेल, बार व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागला होता. आता कुठे हळूहळू हॉटेल आणि बार व्यवसायिकाची गाडी रुळावर आलेली असताना शासनाकडून अबकारि कराचा ओझं मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल व्यवसायिकावर लादला आहे.

हा अबकारी कर एक रकमी भरावा लागणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते या साठी हॉटेल व्यवसायीकांना ३१ मार्च पर्यंत हा कर भरण्याची मुदत देण्यात आली होती, त्यानंतर शासनाकडून अबकारी कर भरण्यासाठी ९ एप्रिल पर्यत मुदत वाढ देण्यात आली आहे. मात्र अबकारी कराची रक्कम मोठी असल्यामुळे ती तीन टप्प्यात भरण्यासाठी सवलत देण्यात यावी अशी मागणी ठाणे जिल्हा हॉटेल अँड बार असोशिएशन यांच्याकडून शासनाकडे करण्यात आली. मात्र शासनाने हि मागणी फेटाळून लावल्यामुळे अखेर १ एप्रिल पासून रेस्टोरंट अँड बार मध्ये मद्यविक्री करण्यात येणार नसल्याचा निर्णय ठाणे जिल्हा हॉटेल अँड बार असोशिएशन यांच्याकडून घेण्यात आला आहे. याची अमलबजावणी १ एप्रिल पासून करण्यात आली असल्याचे  ठाणे जिल्हा बार आणि हॉटेल असोशिएशनचे सदस्य शैलेंद्र मौर्य यांनी आज पत्रकार परिषदेत  दिली आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील रेस्टोरंट अँड बार मालकांनी एकमताने हा निर्णय घेतला असल्याचे अध्यक्ष मौर्य यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -