घरमहाराष्ट्र'नुसतं फर्निचरचं दुकान म्हणजे हॉस्पिटल नाही'; आनंद महिंद्रांवर मुख्यमंत्र्यांचा निशाणा

‘नुसतं फर्निचरचं दुकान म्हणजे हॉस्पिटल नाही’; आनंद महिंद्रांवर मुख्यमंत्र्यांचा निशाणा

Subscribe

आरोग्य व्यवस्था वाढवायला सांगणाऱ्या आनंद महिंद्रांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला.

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सरकार सातत्याने लॉकडाऊनचा इशारा देत होतं. दरम्यान, राज्यातील विरोधी पक्षांसोबत महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांनी देखील लॉकडाऊनवर नाराजी व्यक्त केली होती. ट्विट करत आनंद महिंद्रा यांनी लॉकडाऊन न करता आरोग्य व्यवस्था वाढवा, अशी सूचना महिंद्रा यांनी केली होती. दरम्यान, आजच्या लाईव्हमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिंद्रा यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या लाईव्हमध्ये लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मी त्यांचं नाव घेणार नाही, पण एका उद्योगपतीने सांगितलं की लॉकडाऊन करायचाय, तर आरोग्य सुविधा वाढवा, असं म्हटलं आहे. आरोग्य सुविधा वाढवतच आहोत. गेल्या वर्षभरात आपण आरोग्य सुविधा वाढवली, अजूनही वाढवतो आहोत. पण हे जे काही आपल्याला सल्ले देत आहेत, ज्या उद्योगपतींनी आरोग्य सुविधा वाढवायला सांगितलं, त्यांना मी हात जोडून सांगू इच्छितो, की आरोग्य सुविधा आपण वाढवतोच. पण कृपा करून रोज मला किमान ५० डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांची महाराष्ट्रात पुरवठा होईल, अशी काहीतरी सोय करा. कारण नुसतं फर्निचरचं दुकान म्हणजे हॉस्पिटल नाहीत, असं म्हणत अप्रत्यक्षपणे मुखअयमंत्र्यांनी आनंद महिंद्रांवर निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण लॉकडाऊनचा इशारा; दोन दिवसात निर्णय घेणार – मुख्यमंत्री


anand mahindra tweet

- Advertisement -

हेही वाचा –  मास्क न वापरणं यात काय शौर्य?; नाव न घेता राज ठाकरेंना टोला


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -