घरताज्या घडामोडीराज्यातील जेलमध्ये कोरोनाचा कहर! आतापर्यंत ९ कैदी आणि ८ जेल कर्मचाऱ्यांचा मृत्यू!

राज्यातील जेलमध्ये कोरोनाचा कहर! आतापर्यंत ९ कैदी आणि ८ जेल कर्मचाऱ्यांचा मृत्यू!

Subscribe

राज्यात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थिती खूप बिकट होत चालली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने होत असून मृत्यूचा आकडा देखील तितकाच वाढत आहे. राज्यातील जेलमध्ये कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहे. यामुळे आतापर्यंत राज्यातील जेलमधील ९ कैदी आणि ८ जेल कर्मचाऱ्यांना मृत्यू झाला आहे.

माहितीनुसार, राज्यात जेलमधील सध्या ३६३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे. यामध्ये २५९ कैदी आणि १०४ जेलमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यातील ९ कैद्यांचा आणि ८ जेल कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. १ हजार ६८५ कैद्यांचे लसीकरण झाले आहे. त्यामध्ये १ हजार २३० चाचणी अंतर्गत आणि ४५५ दोषी कैदी आणि ३ हजार १४० जेल कर्मचाऱ्यांना लसी दिली आहे.

- Advertisement -

राज्यात मंगळवारी ५८ हजार ९२४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३५१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३८ लाख ९८ हजार २६२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६० हजार ८२४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मंगळवारी दिवसभरात ५२ हजार ४१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ३१ लाख ५९ हजार २४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.०४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५६ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Lockdown 2021: नव्या नियमावलीत मुंबई लोकल आणि रेल्वेसेवाही ठप्प?


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -