घरताज्या घडामोडीमहाराष्ट्र युवक काँग्रेस कंट्रोल रुमची हजारो नागरिकांना मदत, सत्यजित तांबेंनी दिली माहिती

महाराष्ट्र युवक काँग्रेस कंट्रोल रुमची हजारो नागरिकांना मदत, सत्यजित तांबेंनी दिली माहिती

Subscribe

विशेष म्हणजे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या या कोविड कंट्रोल रुमचे काम ४ महिला सांभाळत आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे राज्यातील आरोग्या व्यवस्था कोलमडली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या प्रकरणांमुळे जनतेला मदत करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने कोविवड कंट्रोल रुमची स्थापना केली आहे. यामुळे या कंट्रोल रुमचा रोज हजारो नागिरकांना उपयोग होत आहे. रुग्णांना बेड मिळवून देणे, औषध उपलब्ध करणे, आयसीयू, व्हेंटिलेटरचे बेड मिळवून देणे अशी अनेक कामांमध्ये राज्यातील रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत होत असल्याची माहिती महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने कोरोना संकटामध्ये एका कट्रोल रुमची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि त्याच्या माध्यमातून रोज हजारो रुग्णांना आणि नातेवाईकांना मदत करण्याचे काम युवक काँग्रेसच्या वतीने सुरु आहे. रक्तदान शिबिर असेल रुग्णालयात बेड उपलब्ध करणे असेल आयसीयू बेड किंवा व्हेंटिलेटरचे बेड असेल रेमडेसिवीरचा औषधाबाबत असेल अशी अनेक कामे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कोविड कंट्रोल रुमच्या वतीने करण्यात येत आहे. यामध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या या कोविड कंट्रोल रुमचे काम ४ महिला सांभाळत आहेत. ज्या महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या भगिणी आहेत त्या सांभाळत आहेत. डॉ. वैष्णवी किराड, वैद्यकीय सहाय्यक विभागाच्या समन्वयक आहेत. स्नेहल डोके- महाराष्ट्र युवक काँग्रेस सचिव, शिवाली वडेट्टीवार- महाराष्ट्र युवक काँग्रेस सरचिटणीस, करिना झेव्हियर- महाराष्ट्र युवक काँग्रेस कायदेशीर विभागाच्या प्रमुख या चार महिला सर्व काम पाहत आहेत.

- Advertisement -

या चार महिला कोविड कंट्रोल रुम सांभाळत आहेत. त्यांना मदत करत आहेत. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गिरीष किशोर दत्त आणि शिवराज मोरे या कंट्रोल रुमच्या माध्यमातून राज्यातील हजारो लोकांना मदत करण्याचे काम सुरु आहे. अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली आहे. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून नागरिक किंवा रुग्ण महाराष्ट्र युवक कॉंग्रेसच्या कोविड हेल्पलाईनला मदत मागू शकतात. संपर्क साधल्यास त्वरित मदत केली जाईल अशी माहितीही युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -