घरमहाराष्ट्रVirar Covid Hospital Fire: घटनेतील दोषींवर कारवाई करणार - एकनाथ शिंदे

Virar Covid Hospital Fire: घटनेतील दोषींवर कारवाई करणार – एकनाथ शिंदे

Subscribe

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना घटनेतील दोषींवर कारवाई करणार, कोणालाही पाठीशी घालणार नाही, असं सांगितलं. ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचं देखील शिंदे म्हणाले. एसीमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि स्फोट झाला असं प्रथम दर्शनी माहिती घेतल्यानंतर समजलं, असं शिंदें म्हणाले.

विजय वल्लभ रुग्णालयातील घटना अतिशय दुर्दैवी आहे. एसीचा स्फोट झाल्याने रुग्णालयाला आग लागली. जी काळजी घ्यायला हवी होती ती घेतली गेली नाही. यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे जे यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगतिलं. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या छोट्या आगीचं मोठ्या आगीत रुपांतर झालं. सर्व रुग्ण ऑक्सिजनवर होते. १७ पैकी ४ रुग्णांना वाचवण्यात यश आलं.१३ जणांचा दुर्दैवी मृत्य झाला. या घटनेत ज्यांचा निष्काळजीपणा असेल, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, असं शिंदे म्हणाले. यावेळी रुग्णालयातील रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात येत असल्याचं देखील सांगितलं. तसंच, ज्या चार रुग्णांना वाचवलं त्या चार रुग्णांची स्थिती गंभीर आहे. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात ताबडतोब हलवलं असल्याची माहिती शिंदेंनी दिली.

- Advertisement -

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आज रात्री ३ ते ३.३० च्या दरम्यान भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात ९० जण उपचार घेत होतं. तर आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास १७ रुग्ण उपचार घेत होते. यातील १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -