घरट्रेंडिंगCorona virus Strain: कोरोनाच्या वेगवेगळ्या स्ट्रेनमध्ये लक्षणे वेगळी का असतात? जाणून घ्या

Corona virus Strain: कोरोनाच्या वेगवेगळ्या स्ट्रेनमध्ये लक्षणे वेगळी का असतात? जाणून घ्या

Subscribe

नव्या स्ट्रेनमध्ये कोरोनाची लक्षणेही बदलेली पहायला मिळली.

देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा तीव्र असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच विविध लक्षणे कोरोनाचे बदलचे म्युटेशनशी सामना करावा लागला आहे. कोरोनच्या दुसऱ्या लाटेतही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा सामना करावा लागतो आहे. नव्या स्ट्रेनमध्ये कोरोनाची लक्षणेही बदलेली पहायला मिळली. कोरोनाची दुसरी लाट सोबत नवी लक्षणेही घेऊन आली त्यामुळे देशात कोरोनाचा कहर आणखी वाढत चालला आहे. दुसऱ्या लाटेत देशातील मृत्यूसंख्या वाढली आहे. मात्र कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमध्ये लक्षणे वेगळी का असतात असा प्रश्न सर्वांना पडला असेल. जाणून घ्या.

स्ट्रेन किंवा म्युटेशन म्हणजे काय?

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कोणताही व्हायरसचे संक्रमण होते त्यावेळी तो त्याच्यासारखा दुसरा व्हायरस तयार करतो मात्र त्यात थोडा बदल असतो. त्यालाच कोरोनाचा नवा स्ट्रेन किंवा म्युटेशन असे म्हणतात. कोरोनाचा विषाणू शरीरात गेल्यानंतर त्यात बदल होतात. त्यामुळे जेव्हा व्हायरसमध्ये जेव्हा थोडा बदल होतो तेव्हा त्याच्या लक्षणांमध्येही बदल होतो.

- Advertisement -

E484Q आणि L452 हे दोन्ही म्युटेशनचे मिश्रण आहे. यामुळे कोरोना संक्रमण वेगाने होते आणि अँटिबॉडीजवर परिणाम करते. याचा परिणाम केवळ दुर्बल घटकांवर होत नाही तर तरुणांवर देखिल होतो. डबल म्युटेशनमुळे अनेक संकटांना आणि नव्या लक्षणांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे झालेल्या बदलांमुळे लोकांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून येत आहेत. श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे त्याचबरोबर शरीरात ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे.


हेही वाचा  – CSIR Serosurvey: धूम्रपान करणारे, शाकाहारी, O Blood Group असणाऱ्यांना कोरोनाचा धोका कमी

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -