घरताज्या घडामोडीकर्नाटकमध्ये सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण होणार, मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पांची घोषणा

कर्नाटकमध्ये सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण होणार, मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पांची घोषणा

Subscribe

महाराष्ट्रात लसीकरणावरुन गोंधळ

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. महारष्ट्रासह अनेक राज्यांत कोरोनाचा दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. कर्नाटक सरकारने १८ ते ४४ वर्षांमधील नागरिकांचे लसीकरण मोफत करणार असल्याची घोषणा केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी मोफत कोरोना लसीकरण करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण केंद्र सरकार करणार आहे.

कर्नाटकमध्ये कोरोनाने हाहाकार घातला आहे. मोफत लसीकरण करणार असल्याची माहिती कर्नाटकाचे मुख्यमंत्र्यांनी ट्विट करुन दिली आहे. बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हटले आहे की, राज्यातील १८ ते ४४ वर्षांमधील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण मोफत करण्यात येणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण केंद्र सरकाद्वारे करण्यात येणार आहे. २८ एप्रिलपासून पात्र असलेल्या सर्वांना नोंदणी करण्यास सुरुवात करावी असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी केले आहे.

- Advertisement -

कर्नाटकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात १४ दिवसांचा जनता कर्फ्यू लावला आहे. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. किराणा माल आणि आवश्यक वस्तूंची दुकनांना परवानगी देण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये दिवसाला १० हजार कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. कर्नाटकमध्ये २ लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात लसीकरणावरुन गोंधळ

राज्य सरकारमधील एका घटक पक्षाकडून सर्व नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे राज्य सरकारमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसत होते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन लसीकरणाबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगत उच्चाधिकार समितीमार्फत निर्णय जाहीर केला जाईल असे सांगितले होते. तर काँग्रेस नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीला श्रेयवादावरुन फटकारले होते यामुळे राज्य सरकारमध्येच कोरोना लसीकरणावरुन गोंधळ असल्याचे दिस आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोफत लसीकरणाबाबत निर्णय झाला असून मुख्यमंत्री लवकरच याबाबत निर्णय जाहीर करतील असे मंगळवारी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -