घरताज्या घडामोडीदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक

Subscribe

अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने श्रीनिवासवर कारवाई केली

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक करण्यात आली आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने श्रीनिवासवर कारवाई केली आहे. दीपली चव्हाण यांच्या आत्महत्या करणाऱ्याला श्रीनिवास रेड्डी हा मुख्य आरोपी होता. दीपाली यांच्या आत्महत्येनंतर श्रीनिवासला अटक करण्याची मागणी करण्यात आली. दीपाली चव्हाण यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये श्रीनिवास यांच्या सततच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट म्हटले गेले होते. श्रीनिवास यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून ते लपून छपून फिरत होते. श्रीनिवास याचे लोकेशन नागपूरात असल्याचे अमरावती पोलिसांना कळताच अमरावती पोलिसांची टीम नागपूरात दाखल झाली. नागपूर गुन्हे शाखा आणि सायबर सेलच्या सहाय्याने रेड्डी यांचे लोकेशन ट्रेस करुन त्यांना शोधण्यात आले व नागपूर गुन्हे शाखेने श्रीनिवास यांना अटक केली.

आर.एफ.ओ दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून स्वत: वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी दीपाली यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहिली. त्या सुसाईड नोटमध्ये रेड्डी यांचे नाव लिहून त्यांनी माझा मानसिक त्रास केल्याचा आरोप त्यात करण्यात आला होता. त्यानंतर रेड्डी यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक पदावरुन निलंबित करण्यात आले.

- Advertisement -

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये श्रीनिवास रेड्डी आणि वरिष्ठ अधिकारी डीओपी विनोद शिवकुमार यांची प्रमुख नावे नोंदवण्यात आली होती. श्रीनिवास यांच्याप्रमाणेच माझ्या आत्महत्येला शिवकुमारही जबाबदार असल्याचे म्हटले होते. शिवकुमारने मला गावकऱ्यांसमोर अश्लील शिवीगाळ केली होती, रात्री बेरात्री तो भेटालया बोलवायचा त्याचप्रमाणे त्याच्या मनाप्रमाणे न वागल्यास तो सतत सस्पेंड करण्याची धमकी देत असे दीपाली यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले होते.


हेही वाचा – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत राज्याची झोळी रिकामीच

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -