घरCORONA UPDATEदिलासा! महाराष्ट्राला आणखी ४०० टन मेडिकल ऑक्सिजन अन् ३० हजार रेमडेसिवीरचा मिळणार

दिलासा! महाराष्ट्राला आणखी ४०० टन मेडिकल ऑक्सिजन अन् ३० हजार रेमडेसिवीरचा मिळणार

Subscribe

विशाखापट्टणम येथून ७ टॅंकर घेऊन निघालेल्या ऑक्सिजन एक्सप्रेसमधून शुक्रवारी राज्याला १०५ टन ऑक्सिजन प्राप्त झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. मात्र आता आता हा तुटवडा कमी होणार आहे कारण महाराष्ट्राला आणखी ४०० टन मेडिकल ऑक्सिजन आणि ३० हजार रेमडेसिवीर मिळणार आहेत. राज्यात मेडीकल ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या आयनॉक्स इंडिया,लींडे,एअर लिक्विड,टायो निप्पॉन,डे एस डब्ल्यू या पाच प्रमुख कंपन्या आणि अनेक छोट्या उत्पादकांनी त्यांचे उत्पादन वाढवले आहे. सर्व उत्पादकांचे मिळून सुमारे १२७० टन ऑक्सिजन उत्पादन होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता आता भरुन निघणार आहे. केंद्रशासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने १ हजार ७८४ टन ऑक्सिजन कोटा महाराष्ट्रासाठी निश्चित केला आहे. यामध्ये राज्य तसेच राज्याबाहेरील उत्पादकांचा समावेश आहे.

राज्याला सध्या इतर विविध राज्यातून ऑक्सिजन पुरवठा होत आहे. ज्यात छत्तीसगड,कर्नाटक व गुजरात राज्यातून साधारण: २०० ते २५० टन ऑक्सिजन दरदिवशी दिले जात आहेत. त्याचप्रमाणे विशाखापट्टणम येथून ७ टॅंकर घेऊन निघालेल्या ऑक्सिजन एक्सप्रेसमधून शुक्रवारी राज्याला १०५ टन ऑक्सिजन प्राप्त झाला आहे.

- Advertisement -

नायट्रोजन टँकरचे ऑक्सिजन टँकरमध्ये रुपांतर

राज्याला ऑक्सिजन प्राप्त होत असताना ऑक्सिजन वाहून येण्यासाठी टँकरची कमतरता भासत असल्याने नायट्रोजन टँकरचे ऑक्सिजन टँकरमध्ये रुपांतर करण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत ६८० टन ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढली आहे. आणखी ३५० ते ४००टन ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढविण्याचे काम सुरु आहे. राज्यातीस सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाद्वारे ऑक्सिजन पुरवठ्याचे विवरणपत्र तयार करुन ते उत्पादक आणि सर्व जिल्ह्यांना देण्यात येणार आहे. २९ एप्रिल रोजी १ हजार ६३६ टनाचे विवरणपत्र देण्यात आले आहे.

सिप्ला, हेटेरो, झायडस,मायलन,सन फार्मा,डॉ, रेड्डीज व जुबिलंट या औषध कंपन्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन करत आहेत. महाराष्ट्रात मे सिप्ला ही कंपनी रेमडेसिवीरचे उत्पादन करत आहे. भिवंडी,पुणे व नागपूर येथील डेपोमध्ये या औषधांचा साठा करण्यात येतो. सात उत्पादक मिळून २१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत महाराष्ट्राला ४ लाख ३५ हजार रेमडेसिवीरचा साठा करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार २१ ते २८ एप्रिल दरम्यान २ लाख ९८ हजार ०२४ इतका साठा खाजगी व शासकीय रुग्णालयात करण्यात आला आहे. तर २८ एप्रिलला २८ हजार ९४५ इतका साठा वितरीत करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccination: २० ते २५ लाख लसीचा उपलब्ध झाल्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू करणार – राजेश टोपे

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -