घरक्राइमMansukh Hiren Death Case: सुनिल मानेंच्या कोठडीत वाढ, न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची...

Mansukh Hiren Death Case: सुनिल मानेंच्या कोठडीत वाढ, न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Subscribe

सुनील माने यांनी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझे यांना मदत केली

प्रख्यात उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मु्ंबईतील घराबाहेर स्फोटकांहित आढळलेल्या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात क्राईम ब्रांचचे अधिकारी सुनील माने यांना २३ एप्रिलला अटक करण्यात आली होती. सुनील मानेंना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना निलंबीत करण्यात आले आहे. एनआयएने सुनिल मानेंना एनआयएच्या न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना २८ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मानेंना बुधवार २८ एप्रिलला न्यायालयात हजर करण्यात आले होते यावेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १ मे पर्यंत वाढ करण्यात आली होती. यानंतर आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुनील मानेंच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आतापर्यंत केलेली सुनील मानेंची तिसरी अटक असून विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना एटीएसकडून अटक करण्यात आली आहे.

सुनील माने यांनी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझे यांना मदत केली होती. मनसुख हिरेन प्रकरणात आणखी काही आजी-माजी अधिकारी एनआयएच्या रडार असून लवकरच त्यापैकी काहींना अटक होण्याची शक्यता आहे. विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर या दोघांना ATS ने अटक करून NIA कडे सोपवले आहे. सनील माने यांना अटक करण्यात आल्यावर त्यांची चारचाकी गाडीही जप्त करण्यात आली आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मनसुख हिरेन यांना रात्रीच्या वेळी फोन करणारे तावडे सुनील मानेच असल्याचा संशय एनआयएला आहे.

- Advertisement -

सुनील मानेंना अटक का करण्यात आली?

सुनिल माने हे मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट ११ चे माजी पोलीस निरीक्षक होते. त्यावेळी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला मदत केली होती, असा संशय NIA ला आहे. ३ मार्च रोजी सचिन वाझे यांच्या CIU च्या केबिनमध्ये सुनील माने, विनायक शिंदे आणि सचिन माने यांची बैठक झाली होती. या बैठकीत मनसुखच्या हत्येची योजना आखण्यात आली होती. त्यानंतर त्याच दिवशी रात्री अंधेरी पूर्व चकाला येथे सचिन वाझे, विनायक शिंदे, सुनील माने आणखी एक माजी अधिकारी यांची या संदर्भात भेट झाली होती. या भेटीचे पुरावे NIA ला मिळाले आहेत. कांदिवली क्राईम ब्रँच येथून तावडे नावाने मनसुख हिरेनला ४ मार्च रोजी रात्री फोन करून घोडबंदर रोडवर बोलावणारी व्यक्ती सुनील माने असावी असा संशय देखील NIA ला आहे.


हेही वाचा: अँटिलीया स्फोटक प्रकरण ते मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -