घरफिचर्ससारांशरमजान पर्व

रमजान पर्व

Subscribe

इस्लाममध्ये सर्वात पवित्र महिना म्हणून रमजानकडे बघितलं जातं. या महिन्यात स्वर्गाची (जन्नत) दारं उघडी होतात. तर नरकाची (जहन्नम) दारं बंद होतात. इस्लामिक कॅलेंडर हे चंद्राच्या कालगणनेवर आधारित असल्याने, रमजानची सुरुवात देखील चंद्रदर्शनाने होते आणि चंद्रदर्शनाने संपते. चंद्रदर्शन झाल्यावर दुसर्‍या दिवशी पहाटेपासून उपवासाला सुरूवात होते. हजरत मुहम्मद पैगंबर यांनी अल्लाहची याच महिन्यात अखंड साधना केली होती. या कडक साधनेतूनच त्यांना अल्लाहचे दर्शन झाले होते. म्हणूनच हा महिना इस्लाममध्ये आराधना आणि करुणेचा म्हणून ओळखला जातो.

भारतीय संस्कृतीमध्ये विविध प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात. विविधतेतून एकता दाखवणारा आपला देश सर्व जात, धर्म, पंथीयांना आपलंस करतो. प्रत्येक धर्मियांचे सण उत्सव हे वेगवेगळे आहेत. त्याच स्वरुप देखील वेगळं आहे. मात्र, धर्म आणि उत्सव जरी वेगळे असले तरी प्रत्येक धर्माच्या उत्सवात सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या जातात. हीच तर खरी आपली भारतीय परंपरा आहे. याच परंपरेतून आपल्या भारतीय संस्कृतीच दर्शन आपल्याला घडत जात. इस्लाम धर्मात रमजानला किंवा रमदान अनन्यसाधारण असे महत्व आहे.

संपूर्ण मुस्लीम बांधव महिनाभर उपवास म्हणजेच रोजे पकडून अल्लाहची प्रार्थना करतात. इस्लाममध्ये सर्वात पवित्र महिना म्हणून रमजानकडे बघितलं जातं. या महिन्यात स्वर्गाची (जन्नत) दारं उघडी होतात. तर नरकाची (जहन्नम) दारं बंद होतात. इस्लामिक कॅलेंडर हे चंद्राच्या कालगणनेवर आधारित असल्याने, रमजानची सुरुवात देखील चंद्रदर्शनाने होते आणि चंद्रदर्शनाने संपते. चंद्रदर्शन झाल्यावर दुसर्‍या दिवशी पहाटेपासून उपवासाला सुरूवात होते. हजरत मुहम्मद पैगंबर यांनी अल्लाहची याच महिन्यात अखंड साधना केली होती. या कडक साधनेतूनच त्यांना अल्लाहचे दर्शन झाले होते. म्हणूनच हा महिना इस्लाममध्ये आराधना आणि करुणेचा म्हणून ओळखला जातो.

- Advertisement -

इस्लाम धर्म हा मुख्य पाच स्तंभावर आधारित आहे. श्रद्धा (शहद), प्रार्थना किंवा नमाज (सलत), दानधर्म (जकात), उपवास (सवम), आणि मक्केची यात्रा (हज) या पाच मुख्य स्तंभापैकी रमजान महिन्यातील उपवास हा एक मुख्य स्तंभ आहे. रमजानच्या महिन्यात प्रत्येक मुस्लीम नागरिकाला उपवास करणे अनिवार्य आहे. यातून फक्त आजारी लोक, प्रवासी, गर्भवती महिला, समज नसलेली अकरा वर्षांच्या आतील मुलं यांनाच सूट देण्यात आलेली आहे. मात्र, आजारी किंवा प्रवासातील लोकांनी आपले सुटलेले उपवास इतर दिवसात पूर्ण करावेत असे देखील सांगितले आहे.

रमजानचा महिना एकमेकांमध्ये स्नेहभाव आणि सद्भावना वाढवणारा असतो. दान, त्याग, शांती, शुद्ध आचरण मनामध्ये रुजवणारा हा महिना. बरकत प्राप्त होते. जे मागाल ते या दिवसात मिळत. अनेकांची स्वप्नपूर्ती होते. संपूर्ण महिनाभर कडकडीत उपवास, पाच वेळचा नमाज, कुराण वाचन आणि अल्लाहचे स्मरण हा या महिन्यातला मुस्लीम बांधवांचा नित्यनियम. याच महिन्यापासून कुराणाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवायला सुरूवात झाली. कडक उपवास करण म्हणजे आचार विचारांचे शुद्धीकरण करुन आत्मशांती मिळवणे. स्वतःला अल्लाहला समर्पित करुन, त्याने दिलेला आदेश सर्वश्रेष्ठ मानून आचरणात आणतात.

- Advertisement -

उपवास(रोजा)-उपवास म्हणजे सूर्योदय ते सूर्यास्त या वेळेत अन्न पाणी न घेता कडक उपवास करणे. सकाळी सूर्योदयापूर्वी जेवण करतात त्याला ‘सहरी’ म्हटले जाते. तर सूर्यास्तानंतर केल्या जाणार्‍या जेवणाला ‘इफ्तार’ म्हटले जाते. दिवसभर काहीच न खाता पिता उपवास केला जातो. असा दिनक्रम संपूर्ण महिनाभर सुरू असतो.

तराविही (रात्रीची विशेष नमाज) – मुस्लीम धर्मात पाच वेळची नमाज करण्यात येते. यात पहाटे फजरची नमाज, दुपारी जोहरची नमाज, पुन्हा सूर्यास्ताच्या आधी असरची नमाज, सायंकाळी मगरीबची नमाज आणि रात्री इशाची नमाज अशा पाच नमाज अदा केल्या जातात. इशाच्या नमाज नंतर रात्री तरावीहची नमाज रमजानमध्ये अदा केली जाते. सर्वच मशिदीत ही विशेष नमाज होते. नमाज सुरू होण्याआधी अजान दिला जातो. यावेळी अल्लाहू अकबर असे माईकमधून उच्चारले जाते. याचा अर्थ अल्लाह हा सर्वश्रेष्ठ असून त्याच्या प्रस्थानेची वेळ झाली आहे. अजान होताच सर्व मुस्लीम बांधव नमाजसाठी मशिदीमध्ये येतात. कुराणातील आयतींचे पठण यावेळी केले जाते.

शबे-ए-कद्र – ही रात्र रमजान महिन्यातली सर्वात पवित्र रात्र समजली जाते. ही रात्र रमजान महिन्याच्या सत्तावीसाव्या दिवशी येते. याच रात्रीपासून कुराणचे पठण सुरू झाले आहे. ही रात्र नमाज, कुराण पठण किंवा अल्लाहचे चिंतन असो. या सर्वच बाबतीत इतर रात्रींपेक्षा उत्तम असते. उद-उदबत्त्या लावून या रात्री अल्लाहचे स्मरण केले जाते. जो या दिवशी रात्रभर जागतो त्याला अल्लाह आशीर्वाद देत असतो. एखाद्या गुन्ह्याची कबुली देऊन माफी मागितली जाते. अल्लाहदेखील त्याला माफ करतो. मात्र, पुन्हा असा गुन्हा होणार नाही याची हमी त्याला अल्लाहसमोर द्यावी लागते.

कुराण-इस्लाम धर्माचा धर्मग्रंथ म्हणजे कुराण होय. हजरत मुहम्मद सल्लूलाहू अलैही व सल्लम यांना अल्लाहकडून प्राप्त झालेला संदेश म्हणजेच कुराण हा मुस्लीम धर्मियांचा धर्मग्रंथ. जो संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शक असा आहे. रमजान महिन्यात कुराणाचे अवतरण झाले. या धर्मग्रंथाची विभागणी 30 खंड आणि 114 अध्यायात करण्यात आली आहे. आदर्श जीवन व्यतीत करणे हा संदेश कुराणमधून देण्यात आला आहे. जीवनातील प्रत्येक गोष्टीवर कुराणमधून भाष्य करण्यात आले आहे. मानव हितासाठी सतत कार्यरत राहणे हीच खरी इस्लामची शिकवण आहे.

जकातुल फित्र-जकातुल फित्र म्हणजेच दानधर्म. रमजानच्या महिन्यात पवित्र दानधर्म करण्याला मोठं महत्व आहे. याचा अर्थ जो हलाखीच्या परिस्थितीत आपलं जीवन व्यथित करतो आहे. अशा गरीब व्यक्तीला दान द्यायचं. यामुळे अशा व्यक्तीलादेखील रमजानच्या उत्सवात सहभागी होऊन आनंद साजरा करता येतो.

रमजानचा पवित्र महिना संपल्यावर चंद्रदर्शन होताच ‘शव्वाल’ हा दहाव्या महिन्याचा पहिला दिवस महिनाभराच्या उपवासाची सांगता करुन उत्सव साजरा करण्याचा हा दिवस ‘रमजान ईद’ किंवा ‘ईद उल-फित्र’ म्हणून साजरी केली जाते. मुस्लीम बांधव नवीन कपडे, टोपी घालून एकमेकांना आलिंगन देत ईद मोठ्या उत्साहात साजरी करतात. आनंदोत्सवात ईमानधारकांनी पैशाची उधळपट्टी करू नये, आपले वर्तन संयमी, विनयशील आणि कृतज्ञतेचे ठेवावे म्हणून ईदच्या दिवशी ईदगाहवर जाऊन दोन रकात नमाज अल्लाहचे आभार आणि कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता पढली जाते.

ईदगाहला येण्यापूर्वी उपवास धारकाच्या परिसरातील दुर्बल व्यक्तींना प्रत्येक उपवासधारकाच्या वतीने किमान दोन किलो गहू शक्य तितके लपवून दिले जातात. याचा हेतू हाच की, त्याने खाऊन-पिऊन ईदगाहला नमाजीकरिता यावे. या दोन किलो गव्हाच्या (किंवा प्रचलित धान्याच्या) हिश्याला ‘फित्रा’ असे म्हणतात. म्हणूनच या ईदला फित्रा वाटप करण्याची ईद म्हणून ‘ईदुल-फित्र’ असे म्हणतात. यादिवशी मुस्लीम कुटूंबीय दुधाचा शिरकूर्मा करुन मित्रमंडळींना वाटतात.

अनीती, असत्य, व्यभिचार अशा गोष्टींना लांब ठेवत. समाजातल्या प्रत्येक घटकावर प्रेम करणे. नीतीमूल्यांची जपवणूक करुन ते अंमलात आणणे. एकमेकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करुन भेदभाव, द्वेष, मत्सर यांना झटकून एकत्र येणे. चांगले बोलणे, चांगले ऐकणे आणि चांगले वागणे हाच खरा संदेश या रमजान महिन्यातून दिला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -