घरट्रेंडिंगगमतीत सुरू केला Dogecoin, आता ठरतेय जगातील पाचवी लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी

गमतीत सुरू केला Dogecoin, आता ठरतेय जगातील पाचवी लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी

Subscribe

मोठ्या संख्येने लोक Dogecoin मध्ये गुंतवणूक करत आहेत. 

जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी म्हणून बिटकॉनसारख्या (Bitcoin)गुंतवणूकडे पाहिले जात होते. मात्र आता बिट कॉइन,होंडा यांसारख्या बाजारपेठांना मागे टाकत Dogecoinने काही दिवसात जगातील सर्वाधिक लोकप्रिय पाचवी क्रिप्टोकरन्सी म्हणून लोकप्रियता मिळवली आहे. Dogecoinचा मार्केट रेट ८६ अरब डॉलरवर पोहचला आहे. होंडाचा मार्केट रेटलाही डॉगी कॉइनने मागे टाकले आहे. त्याचप्रमाणे बिटकॉइनला ही Dogecoin भारी पडला आहे.  रॉबीनहूड या जगातील सर्वाधिक लोकप्रिय बिजनेस प्लॅटफॉर्मही Dogecoinमुळे क्रॅश झाला आहे. यावरुन Dogecoinच्या लोकप्रियतेचा अंदाज येत आहे. मोठ्या संख्येने लोक Dogecoin मध्ये गुंतवणूक करत आहेत.

Dogecoinची सुरुवात

एक मजा मस्ती म्हणून गमतीत सोशल मीडियावर Dogecoinची सुरुवात झाली होती. मात्र आता Dogecoinही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखली जात आहे. बिली मार्कस आणि जॅक्सन पामर या सॉफ्ट इंजिनीअरनी २०१३ मध्ये Dogecoinची सुरुवात केली होती. टेस्ला आणि स्पेसएक्सच्या मुख्य अधिकाऱ्यांनी डॉगी नावाच्या एका मासिकात Dogecoinना फोटो छापला होता. त्यात लाल स्वेटर घातलेला एक डॉग होता. या फोटोनंतर Dogecoinची लोकप्रियता वाढली होती.

- Advertisement -

२०१८मध्ये Dogecoin खरेदी व व्यापार करण्यासाठी भारतात परवानगी नव्हती. २०१८ नंतर भारतात क्रिप्टो करन्सीमध्ये लक्षणीय वाढ पहायला मिळाली. भारतातीत लाखो लोकांनी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. भारतात Coinswitch kuber,WazirX,CoinDCX सारख्या एक्सचेंजच्या माध्यमातून Dogecoinमध्ये गुंतवणूक करता येते. मात्र यापैकी कोणतीही एक्सचेंजची निवड करण्यापूर्वी त्यांची योग्य चौकशी करणे गरजेचे आहे. आपले संपूर्ण बँक डिटेल्स रजिस्टर झाल्याशिवाय एक्सचेंडमध्ये पैसे टाकू नका.


हेही वाचा – Steam Therapy साठी प्रेशर कुकरचा वापर, पोलिसांनी लढवली भन्नाट शक्कल

- Advertisement -

 

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -