घरCORONA UPDATEसुप्रीम कोर्ट अ‍ॅक्शन मोडमध्ये, ऑक्सिजन, औषधव्यवस्था सुधारण्यासाठी १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना

सुप्रीम कोर्ट अ‍ॅक्शन मोडमध्ये, ऑक्सिजन, औषधव्यवस्था सुधारण्यासाठी १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना

Subscribe

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला जबर फटका बसला आहे. यामुळे देशाच्या आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. उपचारांअभावी, ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. याची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. रुग्णांचा ऑक्सिजन अभावी, औषधांअभावी मृत्यू होत असल्यामुळे ऑक्सिजन आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. १२ सदस्यांमध्ये वेगवेगळ्या मेडिकल संस्थांवरचे तज्ज्ञ, आरोग्य मंत्रालयातल्या सचिवांचाही या टास्क फोर्समध्ये समावेश असणार आहे.

देशातील कोरोनाच्या परिस्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने याधीच सुमोटो याचिका दाखल केली होती. यावर गेले काही दिवस सुनावणी सुरु आहे. केंद्राकडून ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी राज्यांकडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायलयाने दिले आहेत. तसंच सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऑक्सिजन आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. टास्क फोर्स केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागाशी सल्ला मसलत करण्यासाठी स्वतंत्र असेल. ही समिती आपली नियमावली तयार करण्यासही स्वतंत्र असेलअसंही सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आदेशात नमूद केलं आहे.

- Advertisement -

या टास्क फोर्समधील सदस्य

  • डॉ. भबतोष विश्वास, माजी कुलगुरू, पश्चिम बंगाल आरोग्य विज्ञान विद्यापीठ, कोलकाता
  • डॉ. देवेंद्र सिंह राणा, चेअरपर्सन, सर गंगाराम रुग्णालय, दिल्ली
  • डॉ. देवी प्रसाद शेट्टी, चेअरपर्सन, नारायण हेल्थकेअर, बंगळुरु
  • डॉ. गगनदीप कांग, प्राध्यापक, ख्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तामिळनाडू
  • डॉ. जेवी पीटर, डायरेक्टर, ख्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तामिळनाडू
  • डॉ. नरेश त्रेहन, चेअरपर्सन, मेदांता रुग्णालय, गुरुग्राम
  • डॉ. राहुल पंडित, डायरेक्टर, क्रिटिकल केअर मेडिसीन अँड आयसीयू, फोर्टिस रुग्णालय, मुंबई
  • डॉ. सौमित्र रावत, चेअरमन, डिमार्टमेंट ऑफ गॅस्ट्रोअँटरॉलॉजी आणि लिवर ट्रान्सप्लांट, सर गंगाराम रुग्णालय दिल्ली
  • डॉ. शिव कुमार सरीन, वरिष्ठ प्राध्यापक, इंस्टीट्यूट ऑफ लिवर अँड बिलीरी सायन्स, दिल्ली
  • डॉ. जरीर एफ उदवाडिया, कन्सल्टेंट चेस्ट फिजिशियन, हिंदुजा रुग्णालय,मुंबई
  • सचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार
  • नॅशनल टॉक्स फोर्स संयोजक देखील टास्क फोर्सचे सदस्य असणार आहेत

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -