घरताज्या घडामोडीCoronavirus: रेल्वेने सात राज्यातील १७ स्टेशनवर तैनात केले कोविड डब्बे

Coronavirus: रेल्वेने सात राज्यातील १७ स्टेशनवर तैनात केले कोविड डब्बे

Subscribe

देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा जीव जात आहे. त्यामुळे सरकारला सध्या सर्व स्तरावरून मदत केली जात आहे. रेल्वे आता सात राज्यांतील १७ स्टेशनवर कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र निवास कोच (डब्बे) तैनात केले आहेत. याबाबतची माहिती शनिवारी भारतीय रेल्वेने दिली आहे. माहितीनुसार विविध राज्यांमध्ये १९८ डब्बे सोपविण्यात आले असून यामध्ये ४ हजार ७००हून अधिक बेड्स आहेत. महाराष्ट्रात एकूण ६० डब्बे तैनात करण्यात आले आहेत.

रेल्वे पुढे असे सांगितले की, राज्यातील इनलँड कंटेनर डेपोमध्ये ११ कोविड केअर डब्बे तैनात करण्यात आले आहेत आणि ते नागपूर महानगपालिकेला दिले आहेत. तेथे नऊ रुग्णांना दाखल करण्यात आले आणि वेगळ्या ठिकाणी हलवल्यानंतर सोडण्यात आले. सध्या पालघरमध्ये २४ डब्बे पुरविण्यात आले असून त्यांचा वापर करण्यात येत आहे.

- Advertisement -

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशमध्ये ४२ डब्बे तैनात केले आहेत. पश्चिम रेल्वेच्या रतलाम संभागने इंदौरजवळील तिही स्टेशनवर २२ डब्बे तैनात केले आहेत, ज्यामध्ये ३२० बेड्स आहेत. तेथे २१ रुग्णांना दाखल गेले गेले आणि सात जणांना आतापर्यंत सोडण्यात आले आहे. तर भोपाळमध्ये २० असे डब्बे तैनात केले आहेत, ज्यामध्ये २९ रुग्ण दाखल केले असून ११ जणांना सोडण्यात आले आहे.

तसेच आसाममधील गुवाहाटीमध्ये २१ आणि सिलचरच्या समीर बरदपुरमध्ये २० अशाप्रकारचे डब्बे तैनात गेले आहेत. शनिवारी रेल्वेने सांगितले की, १९ एप्रिलपासून रेल्वे विविध राज्यांमध्ये २२० टँकरच्या माध्यमातून जवळपास ३ हजार ४०० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन पोहोचवले. तसेच आतापर्यंत ५४ ऑक्सिजन ट्रेनने प्रवास केला आहे. दिल्लीमध्ये १ हजार ४२७ टन, महाराष्ट्रात २३० टन, उत्तर प्रदेशमध्ये ९६८ टन, मध्यप्रदेशमध्ये २४९ टन, तेलंगणात १२३ टन आणि राजस्थानमध्ये ४० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन पोहोचवले आहे. सध्या २६ टँकर ४१७ टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन घेऊन दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि हरयणा येथे जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अफगाणिस्तान: काबुलमधील शाळेजवळ बॉम्बस्फोट; अनेक विद्यार्थ्यांसह २५ जणांचा मृत्यू, ५२ जण जखमी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -