घरमनोरंजन...या कारणामुळे आदित्य पांचोलीच्या लेकीने अभिनेत्री होण्याचा विचार सोडून दिला

…या कारणामुळे आदित्य पांचोलीच्या लेकीने अभिनेत्री होण्याचा विचार सोडून दिला

Subscribe

आदित्यच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य आहे, जी लाइमलाइटपासून दूर राहतो. ती म्हणजे आदित्या पांचोलीची मुलगी सना पंचोली.

अभिनेता आदित्य पंचोली आणि त्याचे कुटुंब काहीना काही कारणामुळे नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरतात. जिया खानच्या खून प्रकरणात सूरज पंचोलीचे नाव समोर आले होते, तर आदित्य कंगना रनौतसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आला होता. त्यावेळी कंगना प्रकरणात आदित्यची पत्नी जरीना वहाब त्यांच्या समर्थनासाठी आली होती. आदित्यच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य आहे, जी लाइमलाइटपासून दूर राहतो. ती म्हणजे आदित्या पांचोलीची मुलगी सना पंचोली.

Aditya Pancholi is a child at heart." - Zarina Wahab | Filmfare.com

- Advertisement -

तिलादेखील बॉलिवूडमध्ये आपले करियर बनवायचे होते, परंतु नशिबाने तिच्यासाठी काहीतरी वेगळे लिहिले होते. सना ने लॉस एंजोलिस येथे शिक्षण घेतले होते. आपल्या कुटुंबियांप्रमाणे तिलाही सिनेसृष्टीत आपली कारकिर्द पार पाडायची होती. २००६ मध्ये सुनील दर्शन सना आणि उपेन पटेल यांच्यासोबत एक चित्रपट बनविणार होते. मात्र ते काही कारणांमुळे शक्य झाले नाही. मात्र सानाची जागा या चित्रपटात कंगना रनौत हिने घेतली होती. चित्रपटाचे नाव होते- शाकालका बुम बूम. हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. याच वेळी कंगना आणि आदित्य पंचोलीच्या बातम्या समोर आल्या होत्या. या चित्रपटातून बाहेर गेल्यानंतर मात्र सनाने अभिनेत्री बनण्याचा विचार डोक्यातून काढून टाकला होता. सनाचे तिचा भाऊ सुरज पांचोली याच्यासोबत खास बॉन्डिंग आहे.

Raksha Bandhan special: Sana Pancholi talks about the other side of Sooraj Pancholi, unknown to many!

- Advertisement -

दोघही स्टार किड एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. एका मुलाखतीत सनाने आपला भाऊ सूरजसोबतच्या बॉन्डिंगविषयी बोलले होते. सना म्हणाली की सूरज स्वभावाला फार कूल आहे, तर मी त्याच्या विरुद्ध आहे. तो अगदी आपल्या वडिलांसारखा आहे, त्याला लवकर राग येतो. असेही ती म्हणाली होती. सना आणि सूरज यांची टाइगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ यांच्यासोबत चांगली मैत्री आहे. कित्येकदा ही चौघे एकत्र पाहायला मिळाली आहेत.


हे वाचा-  शाहिदच्या जन्मानंतर एकट्याने पार पाडली होती जबाबदारी, नीलिमा अझीमचा खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -