घरCORONA UPDATEपुण्यात रुग्णांसाठी धावून आली 'जुगाड अँब्युलन्स' काय आहे हा प्रकार जाणून घ्या

पुण्यात रुग्णांसाठी धावून आली ‘जुगाड अँब्युलन्स’ काय आहे हा प्रकार जाणून घ्या

Subscribe

जुगाड अँब्युलन्सची पुण्यात खूप चर्चा

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पुण्यासारख्या ठिकाणी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. कोरोनाच्या वाढत्या भयानक परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एकीकडे ऑक्सिजनची कमी आहे. तर दुसरेकडे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सची व्यवस्था करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे पुण्यात अँब्युलन्ससाठी एक भन्नाट जुगाड करण्यात आला आहे. पुण्यात रिक्षावाला फोरम संघटनेने रिक्षांचे रुपांतर तात्पुरत्या अँब्युलन्समध्ये केले आहे. आणि अँब्युलन्सला जुगाड अँब्युलन्स असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे रुग्णांना योग्य वेळी ऑक्सिजन सोय उपलब्ध व्हावी यासाठी यासाठी रिक्षामध्ये ऑक्सिजन सिलेंडरही बसवण्यात आला आहे. सध्या या जुगाड अँब्युलन्सची पुण्यात खूप चर्चा सुरु आहे.

पुण्यात सुरु असलेली कोरोनाची भयंकर परिस्थिती पाहता रुग्णांची मदत करण्यासाठी पुण्यातील रिक्षावाला फोरम संघटनेने त्यांच्या रिक्षांचे रुपांतर तात्पुरत्या अँब्युलन्समध्ये केले आहे. अँब्युलन्स प्रमाणे रिक्षामध्ये ऑक्सिजन सिलेंडर,सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे.अँब्युलन्ससाठी हेल्पलाईन नंबरही देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रिक्षाचालकालाही पीपीई किट देण्यात आले आहेत व रिक्षाचालकाला ट्रेनिंगही देण्यात आले आहे.

- Advertisement -

पुण्यात सध्याची परिस्थितीही अनपेक्षित व असामान्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपायही काहीसा अनपेक्षित आणि असामान्य असायला हवा यासाठी जुगाड अँब्युलन्स हा उपक्रम आम्ही राबवत असल्याचे रिक्षा संघटनेने सांगितले. रुग्णालयात भरती होणारा रुग्ण हा बऱ्याचदा रिक्षामधू रुग्णालयात जातो. मात्र बऱ्याचदा रिक्षामधून जात असतानाच रुग्णांची परिस्थिती बिघडते. कधी ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णांचे हाल होतात. त्यामुळे केवळ ऑक्सिजन मिळेपर्यंत रुग्णांना जुगाड अँब्युलन्सचा उपयोग होईल,असेही त्यांनी सांगितले.

जुगाड अँब्युलन्ससाठी सरकारने ठरवून दिलेली रिक्षाची भाडी आकारली जातात. ऑक्सिजनसाठी तासाला १०० रुपये आकारले जातात. त्याचबरोबर ऑक्सिजन मास्कचे शंभर रुपये वेगळे आकारले जातात. त्यामुळे ३००-४०० रुपयात ही जुगाड अँब्युलन्स रुग्णांचा मदतीसाठी धावून येत आहे. पुणे चिंचवडच्या काही परिसरात या जुगाड रिक्षा रुग्णांना मदत करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शनचे दर आटोक्यात आणार, राजेश टोपेंची माहिती

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -