घरटेक-वेकAirtel Thanks Appवर खरेदी करा २४ कॅरेट सोनं, एअरटेल पेमेंट बँकेने लाँच...

Airtel Thanks Appवर खरेदी करा २४ कॅरेट सोनं, एअरटेल पेमेंट बँकेने लाँच केला Digigold प्लॅटफॉर्म

Subscribe

ग्राहक एक रुपये भरुनही गुंतवणूकीला सुरुवात करु शकतात

एअरटेल (Airtel) नेहमीच ग्राहकांसाठी नवीन ऑफर घेऊन येत असते. आता Airtel Thanks Appच्या माध्यामातून ग्राहकांना सोने देखिल खरेदी करता येणार आहे. कारण एअरटेल पेमेंट बँकेने (Airtel Payment Bank) सेफगोल्डचा विचार करुन गोल्ड इनवेस्टमेंटसाठी Digigold प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. त्यामुळे आता एअरटेल पेमेंट बँक सेव्हिंग अकाउंट असणारे ग्राहक एअरटेल थँक्सचा अँपचा वापर करुन Digigold प्लॅटफॉर्मवरुन २४ कॅरेट सोन्याची गुंतवणूक करु शकतात. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाला किंवा मित्राला digigold गिफ्टही करु शकता.

पेमेंट बँकेने दिलेल्या माहितीनुसार असे सांगण्यात आले आहे की, सेफगोल्डद्वारे सुरक्षित ठेवण्यात येईल. त्याचबरोबर ग्राहक Airtel Thanks Appच्या माध्यमातून खरेदी केलेले कधीही सोने विकू शकतात. Digigoldमध्ये  गुंतवणूक करण्यासाठी जास्त पैशांचीही गरज नाही. ग्राहक एक रुपये भरुनही या गुंतवणूकीला सुरुवात करु शकतात, असे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

एअरटेल पेमेंट बँकेचे सीओओ गणेश अनंतनारायण यांनी ‘Digigold आमच्यासाठी नवीन बँकींग ऑफर आहे त्याचबरोबर एक सोपा आणि सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे. ग्राहक केवळ अँपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने सोन्यात गुंतवणूक करु शकतात. ग्राहकांना नियमितपणे गुंतवणूक करता यावी यासाठी आम्ही योग्य पद्धतीने गुंतवणूक योजना आणली’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सेफगोल्डचे एमडी गौरव माथुर यांनी असे म्हटले आहे की, ‘गेल्या एका वर्षात सोन्याच्या किंमतीत अनेक बदल झालेत. त्यामुळे आम्ही ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या मार्गाने आणि किंमतीत डिजिटल गोल्डच्या संबंधित ऑफर आणली आहे’.

गेल्या वर्षभरात सोन्याच्या किंमती मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे लोक थेट जाऊन सोने खरेदी करण्यापासून दूर पळतात. या काळात अनेकांनी डिजिटल गोल्डला प्राधान्य दिले. त्यामुळे एअरटेलची ही नवीन सुविधा ग्राहकांना परवडेल. कारण डिजिटल गोल्ड खरेदी केल्यानंतर ग्राहकांना वाटेल तेव्हा ते विकूही शकणार आहेत. त्याचबरोबर गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या रकमेची गरज नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Jio फोन ग्राहकांसाठी रिचार्जशिवाय ३०० मिनिटांचे विनामूल्य Outgoing calling

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -