घरमहाराष्ट्रMonsoon Good News : यंदा ३१ मे रोजी केरळमध्ये मॉन्सून दाखल होणार...

Monsoon Good News : यंदा ३१ मे रोजी केरळमध्ये मॉन्सून दाखल होणार – IMD

Subscribe

राज्यात एकीकडे कोरोना दुसरीकडे उन्हाचा तडाख्यामुळे हैराण झाल्या राज्यातील नागरिकांसाठी एक दिलासाजनक बातमी आहे. कारण ३१ मेपासूनच केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाने यंदा मान्सून ३१ मे रोजी दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे मान्सून वेळेआधी केरळमध्ये दाखल होणार असल्याने राज्यातही यंदा लवकर पावसाचे आगमन होणार आहे. लवकरचं राज्यात पावसाचे आगमन झाल्यास उकाडा कमी होणार आहे.

- Advertisement -

राज्यातही यंदा लवकर पावसाचे आगमन होणार

दरवर्षी केरळमध्ये १ जूननंतर मान्सूनच्या सरी बरसतात. मात्र यंदा नैऋत्य मोसमी वारे वेळेआधी किनारपट्टीवर येतील असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे यंदा पावसाळा जवळपास आठवडाभर आधीच दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अंदमान बेटांवर मान्सूनच्या सरी २२ मे रोजी बरसतील. त्यानंतर मान्सूनचा प्रवास सुरु केरळमध्ये ३१ मे पर्यंत दाखल होईल, अर्थात मान्सून वेळेआधी केरळमध्ये दाखल होईल असं सांगण्यात येत आहे. अंदमानमध्ये सरी कोसळल्यानंतर ७ दिवसात मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचतो. तौत्के चक्रीवादळामुळे वातावरणात सकारात्मक बदल झाला असल्याने मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. या बातमीमुळे बळीराजाही सुखावला आहे. यंदा सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

यंदा सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार

दर वर्षीच्या सरासरीनुसार केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर ८ ते १० दिवसांत महाराष्ट्रात मान्सून दाखल होतो. त्यामुळं यंदाही ८ ते १० तारखेदरम्यान तळकोकणात मान्सून दाखल होईल. त्यानंतर ४ ते ५ दिवसांत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागानं यंदा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांत चांगलया पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यासंदर्भातलं परिपत्रक हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं असून त्यामध्ये याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक जाहीर


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -