घरठाणेCyclone Tauktae: कल्याणमध्ये ठिकठिकाणी वीज आणि पाणी पुरवठा सुरळीत

Cyclone Tauktae: कल्याणमध्ये ठिकठिकाणी वीज आणि पाणी पुरवठा सुरळीत

Subscribe

रविवारच्या रात्री पासुन कल्याण पूर्वेतील काही भागात रात्रभर आणि सोमवारी दुपार पर्यंत विजेचा लपंडाव सुरूच होता.

कोकण किनार पट्टीवर थडकलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही वादळी वाऱ्याचा फटका दिसून आला. या वाऱ्यामुळे शहरी भागात सोसायट्याच्याने कल्याण पूर्वेत अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. त्यामुळे रविवारी रात्री पासूनच पूर्वेतील बहुतांशी भागातील वीज पुरवठा खंडीत झाला. तर मोहने उदंचन केंद्रात वीज वाहीन्या जळाल्यामुळे सोमवारी सकाळी कल्याण शहरातील काही भागात पाणी पुरवठा होऊ शकला नाही. या दुहेरी संकटामुळे नागरीकांत संताप व्यक्त करण्यात येत होता.

रविवारच्या रात्री पासुन कल्याण पूर्वेतील काही भागात रात्रभर आणि सोमवारी दुपार पर्यंत विजेचा लपंडाव सुरूच होता. अशातच मोहने येथील जलशुद्धी करण केंद्रातील वीज पुरवण्यात मोठ्या प्रमाणावर दोष निर्माण झाला होता. दोष दुरुस्त केल्या नंतर सोमवारी दुपारी काही भागात पाणी पुरवठा करण्यात आला.वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी वीज वितरण कंपनी अपयशी झाल्याचे चित्र दिसून आले. रात्र आणि दिवसभर विजेच्या चाललेल्या लपंडावामुळे नागरीक त्रस्त झाले होते. यानंतर अनेक ठिकाणी विजपुरवठा सुरळीत झाला आहे.

- Advertisement -

कल्याण पूर्वत एका रुणालयाचा अपवाद वगळता बाकी सर्व लहान मोठी रुग्णालये खासगी कोविड रुग्णालये करण्यात आली आहेत. विजेच्या या लपंडावाचा परिणाम कोविड. रुग्णांलयात व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांच्या उपचारावरही होण्याची शक्यता वर्तविली जात होती. कारण रविवार रात्री १२ वाजेपासुन कल्याण पूर्व परिसरातील वीज पुरवठा सातत्याने खंडीत होण्याचा प्रकार झाला होता. तो सोमवारी दुपार पर्यंत कायम होता. मात्र आता तो सुरळीत झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -