घरताज्या घडामोडीNCP कडून ४० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, तर कॉंग्रेसच्या १११ Ambulanceचे कोरोनाविरोधी लढाईला बळ

NCP कडून ४० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, तर कॉंग्रेसच्या १११ Ambulanceचे कोरोनाविरोधी लढाईला बळ

Subscribe

मुंबईतील कोरोनाबाबतची परिस्थिती पाहता सर्व स्तरावरून दानशूर व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष यांच्या माध्यमातून शासन, मुंबई महापालिका यांना कोरोनासंदर्भातील उपकरणे, यंत्रणा यांचा पुरवठा सढळ हस्ते मदत उपलब्ध होत आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबई महापालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांनी, आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी ४० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची उपलब्ध केले आहेत.
राखी जाधव यांनी पालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांच्याकडे शुक्रवारी हे ४० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स संयंत्रे सुपूर्द केले. त्यामुळे आमदार रोहित पवार आणि गटनेत्या राखी जाधव यांचे पालिकेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना तातडीचा प्राथमिक पातळीवरचा उपचार म्हणून ऑक्सिजन कॉन्संट्रेटर हे परिणामकारक ठरत आहेत. त्यामुळे कोविडच्या सौम्य लक्षणांपासून ते आयसीयू बेड उपलब्ध होत नसताना तातडीचे उपचार सुरू करण्यासाठी रूग्णांसाठी हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपयोगी ठरणार आहेत.

- Advertisement -

प्रत्यक्षात गंभीर स्वरूपाच्या रुग्णांची संख्या कमी आहे तरीही रुग्णालयांमध्ये बेड मिळणं कठीण होतं. सौम्य लक्षणांच्या रुग्णांवर ऑक्सिजन सेंटर्समध्येच इलाज होऊ लागल्यास गंभीर रुग्णांच्या इलाजासाठी रुग्णालयात अधिक बेड उपलब्ध होतील व रुग्णालयांवरचा भार ऑक्सिजन सेंटर्सकडून उचलला जाईल व सर्वांना आवश्यकतेप्रमाणे योग्य व तातडीचा उपचार मिळेल, असा विश्वास राखीताई जाधव यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना घाटकोपर ( पूर्व) येथे ऑक्सिजन सेंटर राखी जाधव यांनीच सुरू केला होता. त्यानंतर आता पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही त्यांनी घाटकोपर व विक्रोळी पूर्व येथे फक्त दोन आठवड्यात दोन ऑक्सिजन सेंटर्स उभारून परिसरातील रुग्णांसाठी मोठी सुविधा उपलब्ध करून दिल्याने परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

काँग्रेस पक्षाकडून १११ Ambulances आणि ६१ लाख मास्कचे वाटप करणार –  नाना पटोले

माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी पुण्यतिथीचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने विविध समाजोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ केला आहे. कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांच्या मदतीसाठी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या निधीतून १११ Ambulances देण्यात येणार असून यासंदर्भातील पत्रं आमदारांनी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. तसेच राज्यभरात ६१ लाख मास्कचे वाटप केले जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.


हेही वाचा – पालिकेचा एप्रिल महिन्याचा जीएसटीपोटी देय ८१५.४६ कोटींचा हप्ता रखडला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -