घरताज्या घडामोडीBarge P305: २६ कर्मचारी अद्याप बेपत्ता, नौदलाच्या बचाव कार्याला वेग, डायव्हिंग टीम...

Barge P305: २६ कर्मचारी अद्याप बेपत्ता, नौदलाच्या बचाव कार्याला वेग, डायव्हिंग टीम मुंबई किनाऱ्याहून रवाना

Subscribe

बेपत्ता असलेल्या २६ जणांच्या वाचण्याच्या अपेक्षा फार कमी

तौक्ते चक्रीवादळात बुडालेल्या बार्ज P३०५ मध्ये आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला. हरवलेल्या लोकांना शोधण्यासाठी नौदलाने शोध मोहीमेत आणखी वेग वाढवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बार्जवरील आद्याप २६ कर्मचारी बेपत्ता आहेत. चक्रीवादळानंतर सहा दिवस होऊनही अद्याप बचाव कार्य सुरु आहे. या बचाव कार्याला आणखी वेग देण्यासाठी भारतीय नौदलाने शनिवारी मुंबई किनाऱ्यांवर डायव्हिंग पथक तैनात केले आहे. ही टीम सकाळीच बार्जच्या दिशेने रवान करण्यात आली आहे. नौदलाच्या प्रवक्त्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. बार्ज पी३०५ आणि टग वरप्रदावरुन बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी INS मकरवर साइड स्कॅन सोनार आणि INS तरसा यांच्यासोबत डायव्हिंग टीन तैनात करण्यात आली. ही टीम सकाळी रवाना करण्यात आल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. (Barge P305 diving team leaves Mumbai coast for navy rescue operation)

तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात बुडालेल्या पी ३०५ बार्जमध्ये आता पर्यंत ६० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या आणखी २६ बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध सुरु आहे. बेपत्ता असलेल्या २६ जणांच्या वाचण्याच्या अपेक्षा फार कमी असल्याचे अधिकांऱ्यांनी सांगितले आहे. नौदलाच्या म्हणण्यानुसार, अत्यंत खराब वातावरणाचा सामना करत नौदलाच्या सैनिकांनी पी ३०५ बार्ज वरील २७३ कर्मचाऱ्यांपैकी १८४ कर्मचाऱ्यांना वाचवले आहे. इतर दोन बार्ज आणि एका तेल रिगरवरील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे नौदलाने म्हटले आहे. गेल्या चार दशकातील सर्वात आव्हानात्मक शोध आणि बचाव कार्य असल्याचे नौदल कर्मचाऱ्यांचे प्रमुख मुरलधीर सदाशिव पवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याआधी काही तास मुंबई अरबी समुद्रात अडकले होते. बुधवारी सकाळी पी ३०५ बार्जमधील १८४ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले. INS कोचीन आणि INS कोलकत्ता या जहाजांमधून कर्मचाऱ्यांना मुंबई बंदरात आणण्यात आले. त्याचप्रमाणे INS तेग,INS बेतवा,INS बियास, पी ८१ विमान आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदतीने शोध कार्य आणि बचाव कार्य सुरु आहे


हेही वाचा – आपत्ती व्यवस्थापनाची तयारी वाढवा, केंद्राच्या राज्यांना सूचना

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -