घरताज्या घडामोडीLive Update: भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांना फोर्टिस रुग्णालयात केले दाखल

Live Update: भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांना फोर्टिस रुग्णालयात केले दाखल

Subscribe

 


राज्यात गेल्या २४ तासांत २२ हजार १२२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४२ हजार ३२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३६१ रुग्णांच्या मृत्यू नोंद झाली आहे. सध्या राज्यात ३ लाख २७ हजार ५८० सक्रिय रुग्ण आहेत. सविस्तर वाचा 

- Advertisement -


भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांना फोर्टिस रुग्णालय मोहाली येथे दाखल करण्यात आले. २० मे रोजी मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

- Advertisement -


दिल्लीतील ट्वीटर इंडिया कार्यालयावर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची छापेमारी


मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ५७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४८ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. तर १ हजार ३१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील आता कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ९८ हजार ८६७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १४ हजार ६७१ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख ९८ हजार ८६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


ओडिसा सरकारने यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर काही जिल्हातील कोरोना चाचणी, लसीकरण आणि घरपोच लस सुविधा बंद करण्यात आली आहे,


यास चक्रीवादळापूर्वीच ओडिसातील केंद्रापाडामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात


गोव्यात गेल्या २४ तासांत १ हजार ४०१ नवे कोरोनाबाधित आढळले असून ३८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २ हजार ३६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या गोव्यात १६ हजार २७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


देशात ४५ वर्षांवरील वयोगटातील १४ कोटींहून अधिक जणांचा लसीकरण पाडर पडले. तर १८ ते ४४ वयोगटातील १ कोटींहून अधिक लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालय सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी दिली.


नवी मुंबईतील वाशी पुलावर शनिवारी भाजपच्या माजी आमदाराच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. मानखुर्द वाहतूक पोलिसांनी तत्परता दाखवून त्यांना समजावून पुलावरुन बाजूला केले आणि मानखुर्द पोलिसांच्या हवाली केले. मात्र हा पूल वाशी पोलिसांच्या हद्दीत असल्याने या आमदार पत्नीला वाशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होतं.


महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग असलेल्या रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन १ जूननंतर शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हे संकेत दिले आहेत.


मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि महाराष्ट्र होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी येत्या ९ जून पर्यंत सिंग यांना अटक केली जाणार नाही, असी ग्वाही राज्य सरकारच्या वतीनं उच्च न्यायालयाने दिली आहे. तोपर्यंत सिंग यांनी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंतीही राज्य सरकारने उच्च न्यायालयात केली आहे.


देशात गेल्या २४ तासांत २ लाख २२ हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर ३ लाखांच्या पार मृतांचा आकडा


दिल्लीत ऑटो-टॅक्सी चालकांना मिळणार ५ हजारांची आर्थिक मदत; दिल्ली मंत्रिमंडळाने दिली मंजुरी


परराष्ट्रमंत्री एस जयशंकर अमेरिकेच्या ५ दिवसीय दौऱ्यावर; लसींच्या तुटवड्यावर करणार चर्चा

भारतीय परराष्ट्रमंत्री जयशंकर आज सकाळी अमेरिकेत दाखल झाले आहेत. पुढील पाच दिवस म्हणजे २८ मेपर्यंत ते अमेरिकेच्या दौरा करणार आहेत. संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत टीएस तिरुमूर्ती यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. १ जानेवारी २०२१ रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या प्रवेशानंतर परराष्ट्रमंत्री पहिल्यांदा न्यूयॉर्कला आले आहेत.


देशातील कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात नियंत्रणात येत आहे. मात्र, रुग्णांचा मृत्यूदर कमी होताना दिसत नाही. देशभरातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा ३ लाखाहून अधिक झाला आहे. वर्ल्डोमीटरनुसार, रविवारी रात्री १० वाजेपर्यंतच्या २४ तासात ४ हजार ५६ रुग्णांनी जीव गमावल्यानंतर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा वाढून ३,०३,३५५ वर पोहोचला आहे. यानंतर अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारत तिसरा असा देशा ठरला आहे, ज्या ठिकाणी कोरोनामुळे ३ लाखाहून अधिकांनी आपला जीव गमावला आहे.


म्युकरमायकोसिसचा संसर्ग टाळण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून जिल्ह्यात तीन दिवस जिल्हा प्रशासन सर्वेक्षण मोहीम राबवणार आहे. म्युकर मायकोसिसची लक्षणं असलेल्या खाजगी रुग्णालयात तपासणी केलेल्या रुग्णांची माहिती करणार संकलित करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात येणार आहेत. यासह ग्रामीण भागातही जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहे. यासाठी ग्रामीण भागात होणार डोअर टू डोअर सर्वेक्षण देखील करण्यात य़ेणार असल्याचे सांगितले जात आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -