घरमनोरंजननमस्ते इंग्लंडचं नवंकोरं गाणं 'भरे बाजार में'!

नमस्ते इंग्लंडचं नवंकोरं गाणं ‘भरे बाजार में’!

Subscribe

नमस्ते इंग्लंड या चित्रपटातील नवकोरं पंजाबी तडका असलेल गाणं रिलीज झाल आहे. पुन्हा एकदा अर्जुन आणि परिणितीची केमिस्ट्री यात पाहायला मिळणार आहे.

बॉलीवूडमध्ये पंजाबी गाण्यांचा तडका हे समीकरण प्रेक्षकांसाठी काही नवीन नाही. अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा यांच्या आगामी चित्रपट ‘नमस्ते इंग्लंड’ मधील नवकोरं गाण रिलीज झाल आहे. या गाण्यालाही पंजाबी तडका देण्यात आला असून अर्जुन आणि परिणितीचा भन्नाट डान्स यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. डिजे बादशाह यांच्या रॅपचा स्पेशल टच गाण्याला देण्यात आला आहे. ‘भरे बाजार मे…’, असे या गाण्याचे बोल आहेत.

- Advertisement -

लंडन ते इंग्लंड

निर्माता-दिग्दर्शक विपुल शहा यांचा ‘नमस्ते लंडन’ हा चित्रपट २००७ साली प्रदर्शीत झाला होता. यामध्ये विपुलचा आवडता अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आता तब्बल दहा वर्षांनी विपुल शहा याचा सिक्वेल घेऊन येत आहेत. या सिनेमात अर्जुन आणि परिणितीची जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

Namaste-England-London
नमस्ते लंडन – नमस्ते इंग्लंड

एकत्र केले होते पदार्पण

निर्माते बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूर आणि बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची बहिण परिणिती चोप्रा यांनी ‘इश्कजादे’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. २०१२ साली हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. यापूर्वी परिणितीने ‘लेडिज वर्सेस विकी बहल’ चित्रपटात भूमिका साकारली होती. मात्र प्रमुख नायिकेसाठीचा इश्कजादे हा तिचा पहिला सिनेमा होता. त्यानंतर आता पु्न्हा एकदा अर्जुन – परिणितीची जोडी प्रेक्षकांना ‘नमस्ते इंग्लंड’मधून पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -