घरताज्या घडामोडीCorona Vaccination: उत्तर प्रदेशमधील गावातील लोकांनी लस देणार म्हणून घेतल्या नदीत उड्या

Corona Vaccination: उत्तर प्रदेशमधील गावातील लोकांनी लस देणार म्हणून घेतल्या नदीत उड्या

Subscribe

कोरोना विरोधातील लढाईत लस ही महत्त्वाची अस्त्र आहे. देशात आतापर्यंत १९ कोटींहून अधिक लसीकरण पार पडले आहे. पण देशातील अनेक राज्यात लसीकरण मोहीम आव्हानात्मक झाले आहे. देशात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशातील गावांमध्ये लसीकरण करणे खूप कठीण होत आहे. कारण गावातील लोकांमध्ये कोरोना लसीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ज्यामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासनासमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.

उत्तर प्रदेशातील गावांमध्ये लोकांना लस देणे आणि त्यांच्यामधील लसी संदर्भातील संभ्रम दूर करून जनजागृती करणे हे आव्हानात्मक झाले आहे. लखनऊपासून ५० किलोमीटरहून कमी दूर असलेल्या बाराबंकी जिल्ह्यात १.२ लाख डोस देण्याचे लक्ष्य होते, परंतु आतापर्यंत त्यापैकी एक तृतीयांश दिले गेले आहेत. अशी परिस्थिती असतानाच जेव्हा आरोग्य विभागाचे पथक एका गावात जाते तेव्हा संपूर्ण गावात एकच खळबळ माजते. एवढेच नाहीतर लोकं लसीकरण टाळण्यासाठी नदीत उड्या मारतात. कारण लस घेतल्यानंतर मृत्यू होतो किंवा ती विषारी सुई असल्याची अफवा लोकांमध्ये पसरली आहे.

- Advertisement -

कोरोना महामारीवर मात करण्यासाठी लसीकरण फार महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत लोकांमध्ये संभ्रम निर्माण होणे हे लसीकरण मोहीमेसाठी नुकसानदायक आहे. त्यामुळे प्रशासनाला लवकरच यावर काम करावे लागणार आहे. दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेश सरकारने लसीच्या कमतरतेमुळे ग्लोबल टेंडर काढले आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये १ कोटी ६८ लाख ९ हजार ९३९ जणांचे लसीकरण पार पडले आहे.


हेही वाचा – महिलेला २३ आठवड्यांच्या जुळ्या मुलांचे गर्भपात करण्यास दिल्ली हायकोर्टाची परवानगी

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -