घरठाणेलस तुटवड्याचा फटका प्रादेशिक मनोरुग्णालयाला; आतापर्यंत फक्त ५३ रुग्णांचेच लसीकरण

लस तुटवड्याचा फटका प्रादेशिक मनोरुग्णालयाला; आतापर्यंत फक्त ५३ रुग्णांचेच लसीकरण

Subscribe

मनोरुग्णालयात ८४४ रुग्ण आहेत. त्यामध्ये ५३६ पुरुष तर ३०८ महिलांचा समावेश आहे. सध्याच्या घडीला मनोरुग्णालयातील २३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून यामध्ये १५ पुरुष तर ८ महिला आहेत.

लसीच्या तुडवाड्यामुळे लसीकरणाचा वेग सर्वीकडेच मंदावला आहे. त्यातच ठाण्यातील मनोरुग्णालयात जवळपास ८४४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील फक्त ५३ रुग्णांना लस मिळाली असून उर्वरित रुग्ण लसीपासून वंचित आहेत. धक्कादायक बाब म्हणजे केंद्र शासनाच्या नियमावली नुसार लसीकरण नोंदणी करून देण्यात येत आहेत. मात्र मनोरुग्णालयात जवळपास ३५० रुग्णांचे आधार कार्ड नसल्याने त्यांना लस देण्यात आली नसल्याने समोर आले आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी देशभरात १६ जानेवारी पासून लसीकरण मोहीम जोरदार सुरू करण्यात आली. या दरम्यान फ्रंट लाईन वर्कर, आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलीस यांचे लसीकरण करण्यात आले. त्यांनतर ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

यावेळी प्रादेशिक मनोरुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण करण्यात आले. मात्र या रुग्णालयात असणाऱ्या रुग्णांचे लसीकरण संथगतीने सुरू आहे. सद्या ठाणे प्रादेशिक मनोरुग्णायलात एकूण ८४४ रुग्ण उपचार घेत असून फक्त ५३ जणांचे लसीकरण झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. तर मनोरुग्ण केंद्र सार्वजनिक असल्याने या केंद्रावर इतर नागरिकांना देखील लस देण्यात येत आहे. रुग्णालयातील असलेल्या रुग्णांपैकी आतापर्यंत फक्त ५३ रुग्णांना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. उर्वरीत लसीकरण जशी लस उपलब्ध होईल तशी देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.धक्कादायक बाब म्हणजे केंद्र शासनाच्या नियमावलीनुसार लसीकरण नोंदणी करून देण्यात येत आहे. मात्र मनोरुग्णालयात जवळपास ३५० रुग्णांचे आधार कार्ड नसल्याने त्यांना लस देण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

येत्या दिवसांत ठाणे महापालिका अंतर्गत कोविन अॅपद्वारे रुग्णाची नोंदणी करण्यात येणार असून त्यांना देखील लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. परंतु या सर्व प्रक्रियेला अजून काही अवधी लागणार आहे. तोपर्यंत या रुग्णांना आपला जीव मुठीत घेऊन राहावं लागणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा सर्वत्र जाणवत असून एकीकडे लसीकरणापासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. लसच मिळत नसल्याने लस तुटवड्याचा फटका ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयास बसला आहे. त्यामुळे लसीकरण करण्यात अग्रेसर असणाऱ्या ठाण्यात मनोरुग्णांना लसच मिळत नसल्याने प्रादेशिक रुग्णालयातील व्यवस्थापनाची फरफट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मनोरुग्णालयात ८४४ रुग्ण आहेत. त्यामध्ये ५३६ पुरुष तर ३०८ महिलांचा समावेश आहे. सध्याच्या घडीला मनोरुग्णालयातील २३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून यामध्ये १५ पुरुष तर ८ महिला आहेत. तर मार्च २०२० पासून आतापर्यंत १७३ मनोरुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील १७० जणांनी करोनावर मात केली आहे. तर यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या रुग्णांना लस मिळणे गरजेचे आहे. तसा प्रयत्न मनोरुग्णालय प्रशासनाकडून जोरदार सुरु आहेत. तर कोरोनापासून वाचण्यासाठी रुग्णांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून जो आहार लागतो तो त्यांना सध्या देण्यात येत आहे, तसेच त्याप्रमाणे योग्य ती औषध ही देत आहोत.

- Advertisement -

– संजय बोदडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, ठाणे मनोरुग्णालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -