घरपालघरओस्तवाल बिल्डरविरोधात गुन्हा दाखल

ओस्तवाल बिल्डरविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

अनधिकृत इमारत बांधून महापालिका, सरकार आणि ग्राहकांची फसवणुक केल्याप्रकरणी ओस्तवाल बिल्डरचे मालक उमरावसिंह ओस्तवाल यांच्याविरोधात नवघर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर पूर्वेकडील ओस्तवाल अर्नेस्ट या सात मजली टॉवरच्या मूळ बांधकाम नकाशात बेकायदा फेरबदल करून बोगस नकाशा बनवून अनधिकृत इमारत बांधून महापालिका, सरकार आणि ग्राहकांची फसवणुक केल्याप्रकरणी ओस्तवाल बिल्डरचे मालक उमरावसिंह ओस्तवाल यांच्याविरोधात नवघर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर पूर्वेकडील जेसलपार्क परिसरात मुख्य रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून उभारलेल्या सात मजली ‘ओसवाल ऑरनेट’ च्या मूळ बांधकाम नकाशात बदल करून शासकीय अधिका-यांची बनावट सही व शिक्के मारून ओस्तवल बिल्डरने अनधिकृत इमारत बांधली आहे. याप्रकरणी इमारतीमधील गाळेधारक शिजॉय मॅथ्यू मागील तीन वर्षांपासून तत्कालीन आयुक्त बालाजी खतगांवकर यांच्यासह डॉ. विजय राठोड यांच्याकडे पुराव्यानिशी लेखी तक्रारी करत आहेत. या प्रकरणात सुनावणीचे नाटक करत महापालिकेकडून बिल्डर उमरावसिंग ओसवाल यांना संरक्षण देण्याचे काम केले जात होते. सदर इमारतीस जोत्याचा दाखला (प्लींथ सर्टिफिकेट) व भोगवटा दाखला (ओ.सी.) दिला नसल्याचे नगररचनाकार दिलीप घेवारे यांनी नवघर पोलिसांना लेखी पत्राद्वारे कळवले होते. असे असतानाही बांधकाम प्रारंभ पत्रातील अटीशर्तींनुसार सदर टॉवरची बांधकाम परवानगी रद्द करण्याचे जाणिवपूर्वक टाळण्यात आले होते.

- Advertisement -

विधी विभागाने भोगवटा दाखला देण्याबाबत सहमती दर्शवली होती. त्यानंतर प्रभाग अधिकारी दामोदर संखे यांनी शिजॉय मॅथ्यू यांच्या तक्रारीची दखल घेत नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये यश न मिळाल्याने महापालिकेचे प्रभाग कार्यालय तीनचे प्रभाग अधिकारी दामोदर संखे व उपनिबंधक सहकारी संस्था सतीश देवक्तते यांनी टपालाने दाखल केलेल्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी अखेर तब्बल एका महिन्यांनी बोगस नकाशा बनवून अनधिकृत बांधकाम करणे, सदनिका विकून ग्राहकांची फसवणुक करणे अशा विविध आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. अखेर टपालाने तक्रार नवघर पोलीस ठाण्यात दाखल केली. नवघर पोलिसांनी बिल्डर उमरावसिंग ओसवाल यांच्याविरूद्ध भादविसं कलम ४२०,४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ओसवाल बिल्डर यांना अटक करण्यात आलेली नाही. चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान यांनी सांगितले.

हेही वाचा –

ठाणे: केशरी शिधापत्रिका धारकांना जून महिन्याकरिता सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -