घरमहाराष्ट्रनाशिकदिलासा! महिनाभरात जिल्ह्यात २६ हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण घटले

दिलासा! महिनाभरात जिल्ह्यात २६ हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण घटले

Subscribe

२४ तासांत २९३१ बरे, ९८५ नवे बाधित, ३९ बळी

कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागली असून, नवीन कोरोनाबाधित रुग्णांसह सक्रिय रुग्णसंख्येत घट होवू लागली आहे. जिल्ह्यात १ मे रोजी ३८ हजार ८६ सक्रिय रुग्ण होते. त्यापैकी २६ हजार ९९ सक्रिय रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता अवघे ११ हजार ९८७ सक्रिय रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, शुक्रवारी (दि.२८) दिवसभरात १ हजार ९८५ सक्रिय रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांसह आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात मे महिन्यात कोरोना रुग्णांची उच्चांकी वाढ होत होती. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला होता. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात १० दिवसांचा १२ मे ते २३ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. परिणामी, आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसह सक्रिय रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना कोविड सेंटरमधील खाटा रिकाम्या होवू लागल्या आहेत. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

शुक्रवारी दिवसभरात अवघे 985 नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये नाशिक शहर 424, नाशिक ग्रामीण 433, मालेगाव 20 आणि जिल्ह्याबाहेरील 108 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 4 हजार 589 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 39 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात नाशिक शहर १५, आणि नाशिक ग्रामीणमधील 24 रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 2 हजार 931 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

१६ लाख जणांनी केली कोरोना टेस्ट

जिल्ह्यात १६ लाख ७ हजार ७७० नागरिकांनी कोरोना टेस्ट करुन घेतली. त्यामध्ये १२ लाख २१ हजार ५४१ नागरिकांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. उर्वरित ३ लाख ८३ हजार ९२६ नागरिक कोरोनाबाधित आढळून आले. या रुग्णांवर वेळीच उपचार करण्यात आल्याने तब्बल ३ लाख ६७ हजार ३५० रुग्ण कोरोनामुक्त झाले.

- Advertisement -

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे मे महिन्यात जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रेट १५.९६ टक्क्यांपर्यंत गेला होता. आता जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट ७.१६ असून, मृत्यूदर १.१८ टक्के आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे. परिणामी, आणखी कोरोना पॉझिटिव्ह रेट कमी होईल.
– डॉ. आनंद पवार, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -