घरमहाराष्ट्रनाशिककॅटस् च्या ३५ वैमानिकांची तुकडी देशसेवेत

कॅटस् च्या ३५ वैमानिकांची तुकडी देशसेवेत

Subscribe

कोरोनाच्या सावटामुळे दिमाखदार सोहळा रद्द

गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचे प्रशिक्षण पूर्ण करून ३५ वैमानिकांची तुकडी देशसेवेत दाखल झाली. स्कूलच्या कवायत मैदानावर वरिष्ठ अधिकार्‍यांकडून प्रशिक्षणार्थी जवानांना ‘एव्हिएशन विंग’ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. यंदा कोरोनाच्या सावटामुळे दिमाखदार सोहळा रद्द करण्यात आला.

या प्रशिक्षणा दरम्यान सर्वच गटात उत्कृष्ट अशा अष्टपैलू कामगिरी करत अक्षय मोर यांनी मानाची सिल्वर चिता व बेस्ट इन ग्राऊंड विषयात चषक पटकावले. कॅप्टन निश्चल ठाकूर यांनी उत्कृष्ट उड्डाणाकरिता दिला. कॅप्शन एस. के. शर्मा स्मृती चषक पटकावला. तर कॅप्टन वरूण बाबू यांनी गनरी विषयात कॅप्टन पी. के. गोर चषक पटकावला. ब्रिगेडीयर संजय वढेरा यांच्या हस्ते उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी वैमानिकांना विविध स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -